कोरोना काळात हत्याकांड घडवण्याचे काम भाजपने केले - नाना पटोले

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबाची जाहीर माफी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागायला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.
nana patole
nana patoleSaamTv
Published On

बुलढाणा : जसे जालियानवाला बाग हत्याकांड घडले होते त्याच पद्धतीने या कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या काळात जे लोक मरण पावले, त्यांच्या मृत्यूस सर्वस्वी केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

हे देखील पहा -

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबाची जाहीर माफी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागायला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. खामगाव येथे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या विजय संकल्प कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

nana patole
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे बंजारा नृत्य

अफगाणिस्तानच्या अराजकतेवर बोलताना ते म्हणाले कि, अफगाणिस्तानमध्ये जे काही घडलं आहे, ते केवळ धार्मिकेतच्या नावावर घडले आहे. अफगाणिस्थानातील विद्यार्थी भारतात शिक्षण घेत आहेत. अफगाण विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार सर्वस्वी मदत करेल असेही त्यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com