रेल्वेसेवा पूर्ववत करा; सिंदीवासियांचे रेल्वे रोको आंदोलन

१७ एप्रिलला सिंदिवासीयांचे रेल्वेरोको आंदोलन
Indian Railway
Indian Railway SaamTvNews
Published On

वर्धा : कोरोना काळात केंद्र सरकारने सिंदी (Sindi) शहरातील रेल्वे (railway) सेवा तात्पुरती बंद केली होती. आता दोन वर्षे लोटली तरीही शहरात १५ हून अधिक रेल्वेगाड्यांचे थांबे पूर्ववत झाले नसल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सिंदी शहरातील सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींपासून तर केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वाचेच उंबरठे झिजवले. परंतु, सिंदीवासीयांच्या मागणीकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने अखेर उद्या सकाळी १७ एप्रिलला रेल्वे रोको (Rail roko) आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.

हे देखील पहा :

रेल्वे प्रशासनाला आंदोलनाची कुणकुण लागताच रेल्वे नागपूर (nagpur) विभागाचे अधिकारी व सहकारी बैठकीच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी उपस्थित आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनआक्रोशासमोर त्यांचे काही चालले नाही. हे आंदोलन (Agitation) थांबवायचे असेल तर रेल्वे थांबे पूर्ववत करण्याचे लेखी आश्वासन द्या असे आंदोलनकर्त्यांनी ठणकावून सांगितले.

Indian Railway
केरळमध्ये दिवसाढवळ्या RSS नेत्याची हत्या, 6 मारेकरी हत्या करून फरार!

रेल्वेगाड्यांना थांबा देण्याच्या मागणीकरता सिंदीकरांनी मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), खासदार रामदास तडस (Ramdas Tadas), आमदार समीर कुणावार, यांच्यासह डीआरएम नागपूर यांना निवेदन दिले मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने गावकऱ्यांनी जनआंदोलन उभारले आहे. हे रेल्वे रोको आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार सर्वांनी केला असल्याचे दक्षिण अप-डाऊन रेल्वे प्रवासी ग्रुपचे किशोर सोनटक्के यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com