Wardha News: मनसेचे मुंडण आंदोलन करत निषेध; पाच वर्षांपासून रखडले आर्वी ते तळेगाव रस्त्याचे काम

मनसेचे मुंडण आंदोलन करत निषेध; पाच वर्षांपासून रखडले आर्वी ते तळेगाव रस्त्याचे काम
Wardha News
Wardha NewsSaam tv

चेतन व्यास

वर्धा : आर्वी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन केले. आर्वी ते तळेगाव रस्त्याचे काम पाच वर्षांपासून (Wardha News) रखडल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी मुंडण करत निषेध व्यक्त केला. (Aarvi) आर्वी ते तळेगाव या बारा किलोमीटर रस्त्याचं काम रखडल्यानं अपघाताला (Accident) निमंत्रण मिळते. रस्त्याचं काम वेगानं न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Wardha News
Chalisgaon News: आई-वडिलांना हरिद्वार यात्रेसाठी बसविले; काळजी घ्या म्‍हणत रेल्वेतून उतरताना मुलाचा मृत्यू

आवी– तळेगाव या रस्त्याचे बांधकाम तातडीने व्हावे; अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी या रस्त्याच्या (MNS) बांधकामकारिता खासदार रामदास तडस यांच्या घरावर मोर्चा नेण्यात आला होता. त्यावेळी लवकर बांधकाम केले जाईल असं आश्वासन खासदारांकडून देण्यात आले होते. मात्र अद्यापही बांधकाम रखडलेले आहे.

Wardha News
Jalna News: शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना पाठवला एक किलो कापूस; चुकीच्या आयात, निर्यात धोरणाचा निषेध

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असून बांधकाम न झाल्याने वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. एवढंच नव्हे तर दररोज अपघात या रस्त्यावर होत आहे. तातडीने या रस्त्याच बांधकाम कराव अशी मागणी आता जोर धरतं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com