Wardha Ashti News
Wardha Ashti NewsSaam tv

Wardha Ashti News : धक्कादायक..पोटच्या बाळाला दिले फेकून; माणिकवाडा परिसरात आढळले बेवारस नवजात बालक

Wardha News : वर्धा जिल्ह्यातील माणिकवाडा येथे आज सकाळी दोन घराच्या मध्ये असलेल्या बोळीत नवजात बाळाच्या रडण्याचा शेजाऱ्यांना ऐकू येत होता. एका पिशवीत नुकतेच दोन- तीन तासांपूर्वी जन्मलेले नवजात बालक आढळून आले.
Published on

चेतन व्यास 
वर्धा
: कुमारी मातेने स्त्री जातीच्या नवजात बाळाला जन्म देऊन बेवारस फेकून दिल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील माणिकवाडा येथे उघडकीस आली आहे. माणिकवाडा परिसरात हे बेवारस नवजात अर्भक आढळून आले होते. सदर बाळाचा जन्म अनैतिक संबंधातून झाला असून अवघ्या काही तासातच आष्टी पोलिसांनी कुमारी आईचा शोध लावला आहे. 

वर्धा जिल्ह्यातील माणिकवाडा येथे आज सकाळी दोन घराच्या मध्ये असलेल्या बोळीत नवजात बाळाच्या रडण्याचा शेजाऱ्यांना ऐकू येत होता. यामुळे शेजाऱ्यांनी घराच्या मागील बोळीत जाऊन पाहिले असता एका पिशवीत नुकतेच दोन- तीन तासांपूर्वी जन्मलेले नवजात बालक आढळून आले. याबाबतची माहिती माणिकवाडा येथील माजी सरपंच रोशन मानमोडे यांनी आष्टी पोलीस व साहूर आरोग्य केंद्राला याबाबतची माहिती दिली.

Wardha Ashti News
Wada Rural Hospital : धक्कादायक.. मध्यरात्री महामार्गावर महिलेची प्रसूती; वाडा रुग्णालयात उपचाराला नकार

दरम्यान आष्टी पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून याबाबत सखोल चौकशी व तपास केला. यानंतर सदर नवजात बाळ हे बाजूच्या घरच्या कुमारी आईचे असल्याचे आढळून आले. यानंतर आष्टी पोलिसांनी नवजात बाळासह कुमारी आईला ताब्यात घेतले असून साहूर आरोग्य केंद्रात बाळावर उपचार करण्यात आले. बाळाला फेकून दिल्याने बाळाच्या डोक्याला दुखापत झाली असल्याचे डॉक्टरकडून सांगण्यात आले.  

Wardha Ashti News
Lasalgaon Bajar Samiti : जम्मू- काश्मीर राज्यात प्रथमच मक्याची निर्यात; लासलगाव येथून २६०० टन मका रेल्वेद्वारे रवाना

सध्या बाळाची व आईची प्रकृती चांगली असून कुमारी आईला व बाळाला आष्टी पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांनी वर्धा येथे तपासणी व चौकशीसाठी नेले आहे. तर कुमारी आई नवजात बाळाच्या वडीलाचे नाव सांगण्यास तयार नसून बाळाला स्वीकारण्यास देखील तिने नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटनेबाबत पुढील तपास ठाणेदार बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com