Hinganghat Bajar Samiti : शेतकरी हिताच्या निर्णयात हिंगणघाट बाजार समिती अव्वल; राज्यातीळ ३०५ बाजार समित्यांमधून प्रथम

Wardha News : हिंगणघाट बाजार समितीने २०२३- २४ या वर्षासाठी वस्तुनिष्ठ माहिती आवश्यक पुराव्यासह २०० पैकी १८२ गुणांचा प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे सादर केला होता. नंतर जिल्हास्तरीय समितीमार्फत पडताळणी झाली
Hinganghat Bajar Samiti
Hinganghat Bajar SamitiSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: राज्यात जागतिक बँक अर्थसाहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी २०२१-२२ पासून पणन संचालनालयामार्फत प्रसिद्ध केली जाते. यात २०२३-२४ या वर्षासाठी हिंगणघाट बाजार समितीने राज्यातून पहिला क्रमांक पटकाविला आहे. पणन संचालनालयाच्यावतीने ही घोषणा केली आहे.

वर्ध्याच्या हिंगणघाट बाजार समितीने २०२३- २४ या वर्षासाठी वस्तुनिष्ठ माहिती आवश्यक पुराव्यासह २०० पैकी १८२ गुणांचा प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे सादर केला होता. नंतर जिल्हास्तरीय समितीमार्फत पडताळणी झाली. हा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने पणन संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे पाठविला. राज्यातील ३०५ बाजार समित्यांची २०२३- २४ या वर्षाची वार्षिक क्रमवारी सोमवारी जाहीर केली. त्यात एकूण २०० गुणांपैकी १७८ गुण प्राप्त करून हिंगणघाट बाजार समितीने राज्यातून पहिला क्रमांकावर राहिली आहे. 

Hinganghat Bajar Samiti
Dhule Crime : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अंधारात नेत तरुणाला मारहाण; मोबाइलसह रोख रक्कम घेऊन पसार

असे मिळाले निकषांमध्ये गुण 

हिंगणघाट बाजार समितीला पायाभूत सुविधा व इतर सेवा सुविधा निकषांमध्ये ८० पैकी ७०, आर्थिक निकषांमध्ये ३५ पैकी ३५, वैधानिक कामकाज निकषांमध्ये ५५ पैकी ५०, तर इतर निकषांमध्ये ३० पैकी २३, असे २०० पैकी १७८ गुण प्राप्त झाले. तसेच शेतकरी, हमाल, मापारी, कर्मचारी व सर्व घटकांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे सभापती ऍड. सुधीर कोठारी यांनी सांगितले. बाजार समितीने शेतकरी केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी विविध पायाभूत व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Hinganghat Bajar Samiti
Nashik : सिग्नलचा नियम पाळणं बेतलं जीवावर; पाठलाग करत कार चालकाकडून जीवे मारण्याचा प्रयत्न

लातूर बाजार समितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई
लातूर
: राज्यभरात नावाजलेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागच्या काही दिवसापासून कामगारांना आणि शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बाजार समितीच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा अभाव असल्याने हमाल माथाडी कामगारांची हेळसांड होत आहे. माथाडी कामगारांना आणि शेतकऱ्यांना शुद्ध पाणी द्यावे या उद्देशाने उभारण्यात आलेल्या वाटर फिल्टर धुळखात पडले आहे. तात्काळ पाणी सुरू करावं अशी मागणी हमाल माथाडी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com