Wardha News : कार दुचाकीची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार; कारचालकाची पत्नी गंभीर जखमी

Wardha Accident News : वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील राजनी फाट्याजवळ कार आणि दुचाकीच्या झालेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
Wardha News
Wardha NewsSaam Digital

Wardha News

वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील राजनी फाट्याजवळ कार आणि दुचाकीच्या झालेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर दुचाकीस्वार कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच कारचालक व त्यांची पत्नीही जखमी झाली आहे. राजू पंजाब किनकर (५० रा. नारा? असं मृताचं नाव आहे. त्यांचे सहकारी राजेंद्र खवशे कारचालक सुभाष पराते व त्यांच्या पत्नी या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आलं आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राजू किनकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र खवशे हे दोघेही दुचाकीने गावातील एका मुलाच्या साक्षगंधाकरिता राजनी या गावी गेले होते. कार्यक्रम आटोपून दोघंही गावाकडे परत येत असताना मागून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी जोराची होती की दुचाकीचा चुराडा झाला आहे. यात राजू किनकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर राजेंद्र खवशे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सूरू आहेत. कारचालक सुभाष पराते व त्यांच्या पत्नी जखमी झाल्याने त्यांच्यावरही उपचार करून नागपूरला हलविण्यात आले आहे.

Wardha News
Vasai News : सावधान! वसई किल्ल्यात बिबट्याचा वावर; वन विभागाने परिसरात बसवले कॅमेरे

अकोल्यात 70 प्रशिक्षणार्थी मुलींना विषबाधा

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 70 प्रशिक्षणार्थी मुलींना दुषित पाण्यामुळे विषबाधेच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याच्या पोलीस प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्हटकर अकोल्यात दाखल झाले आहे. अकोल्यातल्या गडंंकी भागातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात दाखल झाले आहे. काल सर्वातआधी हे प्रकरण 'साम'नं समोर आणलं होतं. हा गंभीर प्रकार दाबण्याचा पोलीस प्रशिक्षण केंद्र प्रशासनाकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. आता या प्रकरणाची 'एसआयटी' चौकशीची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Wardha News
Maharashtra Lok Sabha Election : दिंडोरीत भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, भाजपचा मोठा नेता बंडखोरीच्या पवित्र्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com