Amar Kale : योजनांवर कोट्यावधीचा खर्च मात्र शिक्षणावर दुर्लक्ष; खासदार अमर काळे यांची सरकारवर टीका

Wardha News : विद्यार्थिनी आपल्या वडिलांना पैश्याची मागणी. मात्र आर्थिक अडचणीमुळे वडिलांनी काही वेळ थांबण्यास सांगितले. तणावातून सोनियाने आत्महत्या केल्याची घटना वर्धा जिल्ह्यात घडली
Amar Kale
Amar KaleAmar KaleSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: बारावीत प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्याने वडिलांनी थोडे दिवस थांबण्याचे सांगितले. या कारणातून मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मृत विद्यार्थिनीच्या पालकांची आज शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी अमर काळे यांनी सरकारवर जोरदार टिका करत सरकारचा लाचार करणाऱ्या योजनांवर कोट्यवधींचा खर्च केला जात असून शिक्षणावर दुर्लक्ष असल्याची टीका केली आहे. 

बारावीत प्रवेश घेण्यासाठी फी व शैक्षणिक साहित्य करीता विद्यार्थिनी आपल्या वडिलांना पैश्याची मागणी करत होती. मात्र आर्थिक अडचणीमुळे वडिलांनी काही वेळ थांबण्याचा सल्ला दिला होता. अश्यातच तणावातून सोनिया वासुदेव उईके (वय १७) या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेनंतर सगळीकडे खळबळ माजली आहे. शिक्षण राज्यमंत्री असलेले व वर्धेचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या गृह जिल्ह्यातच ही घटना घडली आहे. मृत विद्यार्थिनीच्या पालकांची आज वर्धेचे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी भेट घेत सांत्वन केले.

Amar Kale
Ambarnath : भरधाव स्कुल व्हॅनमधून विद्यार्थी पडले खाली; अंबरनाथमधील धक्कादायक घटना, घटना सीसीटीव्हीत कैद

दुर्दैवाने शिक्षणावर खर्च नाही

बेटी बचाव बेटी पढाव हा नारा भाजपचा आहे. परंतु शिक्षणाकरिता मुली आत्महत्या करीत आहे. यापेक्षा दुसरी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नसावी. ज्या लाचार करणाऱ्या योजना आहे, अशा लाचार करणाऱ्या योजनांवर करोडो रुपये खर्च शासन करत आहे. त्या योजनांचे नाव घेणार नाही; पण राज्य सरकारने सुरू केलेल्या ज्या योजना आहेत. त्या लोकांना लाचार करणाऱ्या योजना आहे. परंतु शिक्षणावर दुर्दैवाने खर्च होताना दिसत नाही.

Amar Kale
Nandurbar : चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; नेसू नदीवर पूल नसल्याने पुरातून काढावा लागतो मार्ग

वर्धा जिल्ह्याच्या शिक्षण विभागात अनेक पद रिक्त आहे. वास्तविक पाहता शिक्षणावर खर्च होणं गरजेचं आहे. पण दुर्दैवानं आपल्या सत्तेची पोळी भाजण्यासाठी सत्ता कशी टीकावी याकरिता लोकांना लाचार करण्याचे काम सरकार करत आहे. त्या दृष्टीने सरकारकडून अशा योजना येत आहे. राज्य सरकारला विनंती आहे; की त्यांनी नागरिकांना लाचार करणाऱ्या योजनांपेक्षा शिक्षणावर खर्च करावा. जेणेकरून विद्यार्थी आत्महत्या करणार नाही. अशा दुर्दैवी घटना घडणार नसल्याचे खासदार अमर काळे म्हणाले.

पालकमंत्र्यांवरही निशाणा 

आतापर्यंत महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. पण शाळकरी विद्यार्थी सुद्धा आज आत्महत्या करत आहे. हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. दुर्दैवाने वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर हे शिक्षण राज्यमंत्री आहे. शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. यामुळे यापेक्षा दुसरी लाजीरवाणी गोष्ट नाही आणि वाईट या गोष्टीचा आहे. अशा घटना होऊ नये शासनाचा एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी आला नसल्याचे देखील काळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com