Walmik Karad: वाल्मिकची संपत्ती की कुबेराचा खजिना; कराड अरबपती कसा झाला?

Walmik Karad Property: सरपंच हत्या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या वाल्मिक कराडचे दररोज नवनवे कारनामे समोर येत आहेत.. मुंडेंच्या घरी घरगडी म्हणून काम केलेला वाल्मिक कराड अब्जावधींचा मालक कसा झाला? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Walmik karad and Dhananjay Munde
Walmik karad
Published On

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सुत्रधार असल्याचा ठपका ठेवलेल्या वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता वाल्मिक कराडकडे अब्जावधींची संपत्ती असल्याचं समोर आलंय. वाल्मिक कराडने खरेदी केलेली संपत्ती दोन्ही पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर खरेदी केल्याचंही पुढे आलंय. त्यातच आता कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर खरेदी केलेल्या जमीनीचा सातबाराच दमानियांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय.. मात्र वाल्मिकची संपत्ती कुठे आणि किती आहे?पाहूयात.

Walmik karad and Dhananjay Munde
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, CID मध्ये मोठा बदल; तपास अधिकारी बदलले

वाल्मिकची संपत्ती की कुबेराचा खजिना

पिंपरी चिंचवड

काळेवाडीत मंजिरी आणि वाल्मिकचा 4 बीएचके फ्लॅट- किंमत - सव्वा तीन कोटी

पिंपरी चिंचवड

वाकडमध्ये वाल्मिक आणि मंजिरीच्या नावे 2 बीएचके फ्लॅट- 1 कोटी

पुणे

दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि विष्णू चाटेच्या नावे अलिशान ऑफिस- 35 कोटी

पुणे

मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावे इमारतीचा मजला - अंदाजे किंमत 75 कोटी

हडपसर

ज्योती जाधवच्या नावे 2 फ्लॅट्स - अंदाजे किंमत 3 कोटी

सिमरी पारगाव (माजलगाव)

सुदाम नरोडेच्या नावे 50 एकर जमीन

शेंद्री (बार्शी)

ज्योती जाधवच्या नावे 50 एकर जमीन

सिमरी पारगाव (माजलगाव)

मनिषा नरोडेच्या नावे 10-12 एकर जमीन

सिमरी पारगाव

वॉचमन योगेश काकडेच्या नावे 15-20 एकर जमीन

दिघोळ (जामखेड)

ज्योती जाधवच्या नावे 15-20 एकर जमीन

बीड- 50 एकर, बार्शी 45 एकर, सोनपेठ 50 एकर जमीन

केज, परळी आणि बीडमध्ये 4-5 वाईन शॉप

Walmik karad and Dhananjay Munde
Santosh Deshmukh Case: वाल्मीक कराडची परदेशात संपत्ती? मोबाइलमधील सिमकार्ड परदेशात रजिस्टर; तपासातून धक्कादायक माहिती उघड

वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत मोठे खुलासे होत असल्याने या प्रकरणात ईडीने लक्ष घालायला हवं, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलीय. औष्णिक विद्यूत केंद्राची राख ते धनंजय मुंडेंसोबत कंपन्यांमध्ये असलेली भागीदारी यातून वाल्मिकने अब्जावधीची माया जमवल्याची चर्चा रंगलीय.. त्यामुळे या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी होणार की ईडी विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणार? याची राज्याला उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com