वडेट्टीवारांनी दिलेला शब्द पाळला; 'तौक्ते' नुकसानग्रस्तांसाठी निधी मंजूर

'तौक्ते' चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी मंजूर
वडेट्टीवारांनी दिलेला शब्द पाळला; 'तौक्ते' नुकसानग्रस्तांसाठी निधी मंजूर
वडेट्टीवारांनी दिलेला शब्द पाळला; 'तौक्ते' नुकसानग्रस्तांसाठी निधी मंजूर SaamTv

वैदेही काणेकर

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यात विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दिनांक १६ व १७ मे २०२१ या कालावधी दरम्यान या चक्रीवादळाचा प्रभाव तीव्र स्वरूपात जाणवला. किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे नुकसान झाले होते. Wadettivar kept his word; Approved funds for 'Tauktae' victims

या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानासाठी मदत देण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलाआहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून तौक्ते चक्रीवादळात नुकसानग्रस्त झालेल्या नागरिकांना मदतीचे वाटप करण्यासाठी १७० कोटी ७२ लाख ७३ हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

वादळग्रस्तांना भरीव स्वरूपात मदत करत, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेला शब्द पाळला आहे. "तौक्ते" चक्रीवादळामुळे किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता.

वडेट्टीवारांनी दिलेला शब्द पाळला; 'तौक्ते' नुकसानग्रस्तांसाठी निधी मंजूर
एकाच शहरात आठ वर्षांपेक्षा जास्त काळ असणाऱ्या पोलिसांची होणार बदली

या वादळात शेती, फळबागांचे व घरांचे मोठे नुकसान झाले होते. या संपूर्ण आपत्तीच्या निवारणाकरता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकसानग्रस्त भागांची दौरे करून पाहणी केली होती. नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी इतर दौरे रद्द करून ४ दिवसीय कोकण दौरा केला होता. कोकण दौऱ्यात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना वडेट्टीवार यांनी वादळग्रस्तांना मदतीचे व सरकार या आपत्तीमध्ये जनतेसोबत असल्याचे आश्वासन दिले होते.

या दौऱ्यादरम्यान वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून वादळग्रस्तांना तातडीच्या मदतीची विनंती केली होती. याच अनुषंगाने आता महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय पारित केला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे बहुवार्षिक पिकांचे नुकसान, मृत जनावरांसाठी मदत, पूर्णतः नष्ट किंवा अंशतः पडझड झालेली कच्ची किंवा पक्की घरे, मत्स्य बोटी, व जाळ्यासाठी अर्थसहाय्य, मत्स्यबीज शेतीसाठी अर्थसहाय्य, दुकानदार व टपरीधारक यांना नुकसानीसाठी मदत जाहीर केली होती.

तसेच इतर अनुज्ञेय बाबींकरिता व बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीच्या माध्यमातून एकूण १७० कोटी ७२ लाख ७३ हजार एवढा निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तसेच वडेट्टीवार यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना हा निधी वितरित करण्याचे आदेश दिले आहेत.

विभागनिहाय मंजूर करण्यात आलेला निधी :

कोकण विभागासाठी १५२ कोटी ४८ लाख २८ हजार, नाशिक विभागासाठी १० कोटी ९७ लाख ६७ हजार, अमरावती विभागासाठी ३ कोटी ५७ लाख ३७ हजार, पुणे विभागासाठी ३ कोटी २४ लाख २५ हजार, नागपूर विभागासाठी ४४ लाख २६ हजार, औरंगाबाद विभागासाठी ९० हजार, याप्रमाणे एकूण १७० कोटी ७२ लाख ७३ हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com