सुरज सावंत
मुंबई : बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात पोलिस खात्याची बदनामी झाल्यानंतर आता आठ वर्षांहून अधिक कालावधी शहरात कार्यरत असणाऱ्या पोलिसांची आंतरजिल्हा बदली करण्यात येणार आहे. Police officers who have been in the same city for more than eight years will be replaced
नवी मुंबई, ठाणे आणि पुणे सारख्या शहरामध्ये आठ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांची शहराबाहेर बदली करण्यात येणार आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतील अश्या शहरांत नवी मुंबई, ठाणे आणि पुणे सारख्या शहरांचा समावेश आहे. मुंबईत अशा 727 पोलिस अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असणाऱ्या व एकाच शहरात 8 वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षकांची यादी तयार करुन त्यांना पाठविण्याचे आदेश दिले होते.
यासंदर्भात एक प्रोफार्माही तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आठ वर्षांपेक्षा अधिक कालावधी शहरात घालवणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या सुविधेनुसार तीन जिल्हे निवडण्यास सांगण्यात आले आहे. त्यात त्यांच्या गावाचा जिल्हाही ठेवण्याचा पर्याय आहे. सचिन वाझे प्रकरणांनंतर पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे.
त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा येथे अनेक वर्षांपासून कार्यरत पोलिसांची बाहेर बदली करण्यात आली होती.त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन आठ वर्षांहून अधिक कालावधी एका शहरात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचीही बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.