रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या मतदानाला सुरुवात

79 जागांसाठी मतदान
रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या मतदानाला सुरुवात
रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या मतदानाला सुरुवातराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड - जिल्ह्यात माणगांव, म्हसळा, तळा, पोलादपूर, पाली व खालापूर या सहा नगरपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. 6 नगरपंचायतींच्या 79  जागांसाठी निवडणूक होत आहे. सहा नगरपंचायतींंमध्ये 102 प्रभागसंख्या आहे. त्यापैकी 21 प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे येथील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

81 प्रभागामध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यापैकी 2 प्रभागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. 79 प्रभागांमध्ये आज 21 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. 82 मतदान केंद्रांमध्ये 82 मतदानयंत्राद्वारे हे मतदान घेण्यात येणार आहे. एखाद्या यंत्रामध्ये बिघाड झाल्यास तेथे व्यवस्था व्हावी म्हणून 72 मतदान यंत्र राखीव ठेवण्यात आली आहेत.

रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या मतदानाला सुरुवात
कार्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या तपासाला मुंबई पोलिसांनी लावला ब्रेक

515 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 34 हजार 640 मतदार 6 नगरपंचायतीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. 17 हजार 344 स्त्री तर 17 हजार 296 पुरुष मतदार आपला हक्क बजावून 234 उमेदवारांचे राजकिय भवितव्य निश्‍चित करणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com