राजेश भोस्तेकर, रायगड -
रायगड : रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबर 2021 ला मतदान (Voting) प्रक्रिया पार पडणार आहे. ओबीसी राजकीय आरक्षण (OBC Reservation) रद्द झाल्याने सहा नगरपंचायतींमधील 21 जागांसाठी मतदान प्रक्रिया होणार नाहीत. ओबीसी आरक्षित जागा आता सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. - Voting for 21 unreserved seats in Raigad district will be taken on 18 January
जिल्ह्यातील 21 अनारक्षित जागांसाठी आता 18 जानेवारीला मतदान प्रक्रिया होणार आहे. सहाही नगरपंचायतींची मतदान मोजणी प्रक्रिया ही 22 डिसेंबर ऐवजी 19 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे आता ओबीसी आरक्षित अनारक्षित केलेल्या जागेवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे.
हेही वाचा -
रायगडात पोलादपूर, माणगाव, म्हसळा, तळा, पाली आणि खालापूर या सहा नगरपंचायतीच्या निवडणुका 21 डिसेंबरला पार पडत आहेत. सहाही नगरपंचायतींमध्ये 17 प्रभाग असून ओबीसी आरक्षित प्रभाग रद्द झाले आहेत. उर्वरित राहिलेल्या प्रभागाच्या निवडणुकीसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे.
ओबीसी जागा या आता अनारक्षित केल्या असून सर्वसाधारण प्रवर्गातून लढविल्या जाणार आहेत. माणगाव 4, पाली 4, म्हसळा 4, तळा 4, पोलादपूर 4 आणि खालापूर 1 या नगरपंचायतींमधील 21 जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. या जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होणार आहे. मत मोजणी प्रक्रिया 19 जानेवारीला पूर्ण होणार आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.