Gram Panchayat Election : राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान, उद्या निकाल

सर्व ठिकाणी मतदानाची तयारी पूर्ण झाली असून सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
Voting
VotingSaamTV

Gram Panchayat Election : राज्यात आज म्हणजेच रविवारी (16 ऑक्टोबर 2022) 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी मतदान (Gram Panchayat Election) होणार आहे. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सर्व ठिकाणी मतदानाची (Voting) तयारी पूर्ण झाली असून सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. तर नागरिकांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. (Gram Panchayat Election 2022)

Voting
Petrol Diesel : महाराष्ट्रासह 'या' राज्यात पेट्रोल महाग; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

या जिल्ह्यातील होणार मतदान

राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. मतदान होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच सोमवारी (17 ऑक्टोबर) लागणार आहे. (Maharashtra News)

उद्या होणार मतमोजणी

1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होणार असून उद्या म्हणजेच सोमवारी (17 ऑक्टोबर) मतमोजणी होणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे. आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून नागरिकांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com