Pandhrpur: विठ्ठल-रुक्मिणी नित्य आणि चंदनउटी पूजा; ऑनलाईन नोंदणी पुढील 3 महिन्यांसाठी फुल्ल

Vitthal Rukmini Pooja: विठुरायाची नित्य आणि चंदन उटी पूजा तीन महिन्यांसाठी पूर्णपणे भरल्या आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या पूजांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून, पहिल्या दिवशीच नोंदणी संपली.
Pandhrpur
Pandhrpuryandex
Published On

भरत नागणे/साम टीव्ही न्यूज

विठुरायाची नित्य आणि चंदन उटी पूजा पुढील तीन महिन्यांसाठी पूर्णपणे भरलेली आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या विविध पूजांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असून, कालच पहिल्या दिवशी काही तासांतच नोंदणी संपली. पूजेच्या नोंदणीमुळे मंदिर समितीला ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न मंदिराच्या विविध कार्यांसाठी उपयोगात आणले जाणार आहे.

विठ्ठल रुक्मिणीच्या विविध पूजा करण्याची संधी सर्वसामान्य भाविकांना मिळावी यासाठी मंदिर समितीने मागील काही महिन्यांपासून सर्वच पूजांची ऑनलाईन नोंदणी सुरु केली आहे. या सुविधेमुळे अनेक भाविकांना पूजा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ३१ मार्च पर्यंतच्या सर्व पूजांची नोंदणी संपल्यानंतर १ एप्रिल ते ३१ जुलै अखेरपर्यंतच्या विठ्ठल रुक्मिणीची नित्य, चंदन उटी, पाद्य, तुळशी पूजांची काल पासून ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे.

Pandhrpur
Shirdi News: साईभक्तांसाठी खुशखबर! साईबाबांच्या 'चर्म पादुका' देशभरातील विविध शहरांमध्ये दर्शनासाठी होणार उपलब्ध

काल पहिल्या दिवशी तीन महिन्यांसाठी विठुरायाची नित्य आणि चंदन उटी पूजा फूल्ल झाल्या आहेत. तर रुक्मिणी मातेची नित्य पूजा, चंदन उटी पूजा, पाद्य पूजा, तुळशी पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. ऑनलाइन पूजा नोंदणीमधून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ७५ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.

Pandhrpur
Akola News: भयावह परिस्थिती! कांद्याच्या उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर, दानापूर हिंगणी गावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. उन्हाळ्यातील उष्णतेपासून देवाला थंडावा मिळावा यासाठी दरवर्षी विठ्ठल रुक्मिणीला गुढीपाडवा ते मृग नक्षत्रा पर्यंत चंदन उटी पूजा केली जाते. चंदन उटी पूजेला विशेष महत्त्व असते. विठुरायाच्या चंदन उटी पूजेला भाविकांनी पहिली पसंती दिली आहे. सर्व पूजांमध्ये मानाची असलेली असलेली विठुरायाची नित्यपूजा देखील अवघ्या काही सात फुल्ल झाली. विठुरायाच्या नित्य पूजेसाठी २५ हजार तर चंदन उटी पूजेसाठी २१ हजार रुपये देगणी शुल्क ठेवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com