Shanishingnapur : शनैश्वर ट्रस्टच्या विश्वस्तांशी चर्चा निष्फळ; हिंदुत्ववादी संघटनांचे आंदाेलन सुरुच

आज माेठ्या संख्येने भाविकांची शनैश्वर मंदिरात उपस्थिती आहे.
Shanishingnapur,
Shanishingnapur, saam tv
Published On

- सुशिल थाेरात

Shanishingnapur : शनैश्वर देवस्थान ट्रस्टने सुरु केलेले ५०० रुपये शुल्क रद्द करुन सर्व भाविकांना शनिचौथ-यावरील दर्शन मोफत करावे याकरीता शनि शिंगणापुरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने आंदोलन सुरु केले आहे. या आंदाेलन (aandolan) बाबत आज तातडीने ताेडगा निघेल अशी शक्यता कमी आहे.

Shanishingnapur,
Pune Bangalore National Highway : पुणे - बंगळूर महामार्गावरील वाहतूक वळवली; जाणून घ्या कारण

शनैश्वर देवस्थान ट्रस्टने शनि चौथ-यावरील दर्शनासाठी सुरु ५०० रुपये शुल्क आकारणी केली जाते. या निर्णयामुळे अनेक भाविकांची अडचण झाली आहे. ही सेवा मोफत असावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांची आहे. त्यासाठी आंदाेलन देखील छेडण्यात आले आहे.

Shanishingnapur,
Makar Sankranti 2023 : मकर सक्रांतीला पतंग का उडवली जाते ? श्री रामाने सुरु केला होता हा उत्सव, जाणून घ्या त्याबद्दल

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी विश्वस्तांच्या मनमानीच्या विरोधात घोषणा दिल्या. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते चौथ-यावर चढले. या अंदोलनानंतर एकच गोंधळ उडाला.

Shanishingnapur,
Satara News : 'अजित पवारांनी आत्मक्लेश करावा'

आज शनिवार निमित्त लाखो भाविकांची मंदीर परिसरात गर्दी असल्याने आंदोलनाने भाविकांचा मोठा गोंधळ उडाला. चौथ-यावर जाण्यासाठी ५०० शुल्क आकारणी रद्द करुन सर्वांना मोफत दर्शन द्यावी अशी मागणी आंदाेलकांनी केली. सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे, अध्यक्ष भागवत बानकर यांनी अंदोलनकर्त्यांशी केलेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com