Vishalgad News : विशाळगडाला राजकारणाचा 'वेढा', हिंसाचारानंतर शाहू छत्रपती विशाळगडावर, मुस्लिम नेतेही आक्रमक

Vishalgad News Update :विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान रविवारी हिंसाचार झाला. यावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यातच खासदार शाहू छत्रपतींनी विशाळगडावर जाऊन पाहणी केली.
Vishalgad News
Vishalgad NewsSaam Digital
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या शिवप्रेमींनी धुडघूस घातल्यानंतर राज्याचं राजकारण पेटलंय. तर यामागे संभाजी भिडेंचे धारकरी असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केलाय. तर अतिक्रमण हटत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतंय? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान रविवारी हिंसाचार झाला. यावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यातच खासदार शाहू छत्रपतींनी विशाळगडावर जाऊन पाहणी केली आणि विशाळगडावरील पीडितांची भेट घेऊन नागरिकांना संरक्षण देऊ शकलो नसल्याबद्दल खंत व्यक्त केलीय.

विशाळगडावर अतिक्रमण झालं असून ते काढण्यासाठी युवराज संभाजीराजेंनी इशारा दिला होता. त्यानंतर संभाजीराजे शिवप्रेमींसह विशाळगडावर गेले. मात्र यावेळी जमलेल्या गर्दीने धुडघूस घालत विशाळगडावर दगडफेक आणि जाळपोळ केली. तसंच धार्मिक स्थळाचंही नुकसान केलं. तर या हिंसाचारामागे धारकरी असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तर संभाजीराजेंनी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय.

Vishalgad News
CM Eknath Shinde : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात पोहोचताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

विशाळगडावर झालेल्या हिंसाचारानंतर सरकारने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्याची घोषणा केलीय. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवलीय. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावलाय.

पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटल्यानंतर ज्या विशाळगडाने छत्रपती शिवाजी महाराजांना आश्रय दिला. तोच विशाळगड सध्या राजकारण, अतिक्रमण आणि हिंसाचाराच्या विळख्यात अडकलाय. त्यामुळे सरकारने सर्वसमावेशक भूमिका घेऊन विशाळगड प्रकरणी तोडगा काढायला हवा.

Vishalgad News
Raigad News : पावसाळी पर्यटन बेततंय जिवावर; मुंबईची तरुणी बुडाली रायगडमधील कुंभे धरणात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com