शिंदे गटाच्या बड्या नेत्याला अटक, एक वर्षांपासून होता फरार, कायद्याच्या बालेकिल्ल्यात अटकेचा थरार

Shinde Group Leader Arrested After One Year Absconding: शिंदे गटाशी संबंधित कुख्यात गुंड विशाल पवारला नाशिक गुन्हे शाखेने इगतपुरीतून अटक केली. एक वर्षांपासून फरार असलेला आरोपी चार गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होता.
Nashik Crime Branch officials after arresting absconding gangster Vishal Chandrakant Pawar from Igatpuri.
Nashik Crime Branch officials after arresting absconding gangster Vishal Chandrakant Pawar from Igatpuri.Saam Tv
Published On

मागील एका वर्षापासुन ४ गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी विशाल चंद्रकांत पवार या कुख्यात गुंडाच्या नाशिकरोड युनिट, गुन्हे शाखा, नाशिक यांनी इगतपुरीमधून मुसक्या आवळल्या आहे. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी स्थानिक गुन्ह्यांचा जलद आणि प्रभावी तपास होण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी नाशिकरोड युनिटची स्थापन केली होती.

Nashik Crime Branch officials after arresting absconding gangster Vishal Chandrakant Pawar from Igatpuri.
अकोल्यात भाजपने डाव टाकला; शरद पवारांचा पक्ष फोडला, सत्ता समीकरणासाठी बहुमताचा आकडा गाठला

इंदीरानगर पोलीस ठाणेच्या ह‌द्दीत हॉटेल साई पॅलेस, इंदीरानगर, नाशिक या ठिकाणी फिर्यादी यांची असलेली मिळकत संशयित विशाल चंद्रकांत पवार व त्याचे ५ ते ६ साथीदारांनी संगनमत करून व कटकारस्थान करून फिर्यादी यांचे दुर्बलतेचा फायदा उचलुन व फिर्यादी यांची मौल्यवान मिळकत हडपण्याकरिता खोटे कागदपत्रे तयार करून फिर्यादी यांची फसवणुक केल्याने इंदीरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Nashik Crime Branch officials after arresting absconding gangster Vishal Chandrakant Pawar from Igatpuri.
GST अधिकाऱ्याची आत्महत्या, 7 दिवसानंतर पत्नीचा खळबळ उडवून देणारा दावा

विशाल पवार आणि पवन पवार हे दोघेही शिंदे गटात आहे. दरवेळी ते पक्ष बदलत गुन्हेगारीसाठी संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतात. जेलरोड भागात पवार बंधूंच्या टोळीकडून नागरिकांना त्रास दिला जातो. खंडणी, खून, हत्या असे अनेक आरोप या दोघांवर आहे.

Nashik Crime Branch officials after arresting absconding gangster Vishal Chandrakant Pawar from Igatpuri.
उधार घेतलेले 10000 रुपये कधी देणार? रागाच्या भरात सपासप वार, तरुणाचा मृत्यू

गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे दाखल गुन्ह्यांमधील फरार आरोपींचा शोध घेत असताना नाशिकरोड गुन्हे युनिटचे पोलिस उप निरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे यांना सदर गुन्ह्यातील संशयित विशाल चंद्रकांत पवार हा इगतपुरी या ठिकाणी असल्याबाबत खात्रीलायक बातमी मिळाल्याने सदर बातमीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक संदिप पवार, पोलिस उप निरीक्षक दिलीप भोई, अविनाश देवरे व दत्तात्रय चकोर आदींनी इगतपुरी या ठिकाणी जावून अधिक शोध घेतला असता घाटनदेवी या ठिकाणी असलेल्या साई कार हॉटेल येथे संशयित विशाल चंद्रकांत पवार हा सापडला. संशयित विशाल चंद्रकांत पवारवरइंदीरानगर पोलीस ठाणे, नाशिकरोड पोलीस ठाणे, अंबड पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Nashik Crime Branch officials after arresting absconding gangster Vishal Chandrakant Pawar from Igatpuri.
अवघ्या 150 रुपयांत माजी आमदारांच्या कन्येचा विवाह; शाही खर्च टाळून शिक्षकांना 30 लाखांची मदत

सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलिस उप निरीक्षक संदिप पवार, पोलिस उप निरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, पोलिस उप निरीक्षक दिलीप भोई, सहायक पोलिस उप निरीक्षक मंगला जगताप, पोह अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर आदींनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com