Sangli Politics : विशाल पाटील यांच्या बंधूंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; सांगलीत नेमकं घडतंय काय?

Sangli Political News in Marathi : इच्छुक उमेदवार विशाल पाटील नाराज झाले आहेत. तर सांगलीत निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढवल्या आहेत. याचदरम्यान, त्यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी आज सकाळी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.
Sangli Politics
Sangli Politics Saam tv

Vishal Patil Latest News :

महाविकास आघाडीने राज्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. या फॉर्म्यु्यात सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेली आहे. सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळाल्याने काँग्रेसचे स्थानिक नेते, इच्छुक उमेदवार विशाल पाटील नाराज झाले आहेत. तर सांगलीत निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढवल्या आहेत. याचदरम्यान, त्यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी आज सकाळी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत सहभागी झालेले नाहीत. त्यांनी राज्यातील अनेक जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी सांगलीच्या जागेवर अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. तर या जागेसाठी काँग्रेसचे नेते विशाल पाटील इच्छुक होते. मात्र, ही जागा ठाकरे गटाकडे गेल्याने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी या मतदारसंघात प्रचारही सुरु केला आहे.

Sangli Politics
Bhujabal Farm House: ड्रोनने भुजबळांच्या घराची टेहळणी; पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक कारण आलं समोर

तर दुसरीकडे ही जागा ठाकरे गटाला मिळाल्याने विशाल पाटील नाराज झाल्याचं वृत्त आहे. कालच्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतरही विशाल पाटील यांची नाराजी कायम असल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान, विशाल पाटील यांचे बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुंखे, अय्याज नाईकवाडी आदी उपस्थित होते.

Sangli Politics
World Parkinson's Disease Day : पार्किन्सन आजार कसा होतो? याची लक्षणे कोणती? जाणून घ्या

विशाल पाटील काय भूमिका घेणार?

काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे सांगलीच्या निवडणुकीबाबत संध्याकाळी स्पष्ट करणार भूमिका करणार आहे. विशाल पाटील हे पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना प्रतीक पाटील भेटून गेल्यानंतर विशाल पाटील यांच्या भूमिकाकडे लक्ष असणार आहे. विशाल पाटील लोकसभा निवडणूक लढवणार का ? की पक्ष आदेश मानणार याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com