Vinyak Raut: पंतप्रधानांचा ताफा थांबवल्या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी; विनायक राऊतांची मागणी  

तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट भाजपाचे (BJP) महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी केलं आहे. यावरून खा. विनायक राऊत यांनी भाजपला सुनावलं आहे
Vinyak Raut
Vinyak Rautअमोल कलये
Published On

रत्नागिरी - ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान फिरोजपूर येथे नरेंद्र मोदी यांची मोठी सभा होणार होती. पण या सभेला जाताना काही आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यायच्या ताफ्याला अडवलं. पंतप्रधान मोदींचा ताफा जवळपास 15 ते 20 मिनिट घटनास्थळी थांबला होता. दरम्यान या घटनेवर भाजपकडून (BJP) काँग्रेसवर (Congress) सडकून टीका केली जात आहे. यावर आता शिवसेनेचे गटनेते खासदार विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रया दिली आहे. (Vinayak Raut demand inquiry regarding PM Seciurity Breach Case)

ते म्हणले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा ज्या प्रकारे ज्या ठिकाणी थांबला ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. देशाच्या पंतप्रधानांचा ताफा अशा पद्धतीने थांबवण्याची प्रथमच अशी वेळ आलेली आहे. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी त्रयस्थपणे होण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया संसदेतील शिवसेनेचे गटनेते खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.

Vinyak Raut
Afc Womens Asian Cup: आशियाई स्पर्धेसाठी तीन भारतीय पंचांची निवड

पुढे ते म्हणले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashi Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट भाजपाचे (BJP) महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी केलं आहे. यावरून खा. विनायक राऊत यांनी भाजपला सुनावलं आहे, अत्यंत निर्लज्जपणाचा हा कळस आहे, अशा मनोविकृतीची भाजपच्या पदांवर काम करत असतील तर त्यांची ताबडतोब हकालपट्टी करावी आशा शब्दांत राऊत यांनी भाजपला सुनावलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com