Afc Womens Asian Cup: आशियाई स्पर्धेसाठी तीन भारतीय पंचांची निवड

भारतात होणाऱ्या आशिया फुटबॉल महासंघाच्या(एएफसी) महिला आशियाई फुटबॉल करंडक स्पर्धा-२०२२ साठी तीन भारतीय महिला पंचांची(रेफ्रींची) निवड झाली आहे. २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान पार पडणाऱ्या या स्पर्धेत रंजिता देवी टेकचाम (मुख्य पंच), फर्नांडिस उवेना (सहाय्यक) आणि रिबेलो मारिया पिएडाडे (तांत्रिक निरीक्षक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे
Afc womens asian cup: आशियाई स्पर्धेसाठी तीन भारतीय पंचांची निवड
Afc womens asian cup: आशियाई स्पर्धेसाठी तीन भारतीय पंचांची निवड- Saam TV
Published On


मुंबई : भारतात होणाऱ्या आशिया फुटबॉल महासंघाच्या (AFC) महिला आशियाई फुटबॉल करंडक स्पर्धा-२०२२ साठी तीन भारतीय महिला पंचांची (रेफ्रींची) निवड झाली आहे. २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान पार पडणाऱ्या या स्पर्धेत (Sports) रंजिता देवी टेकचाम (मुख्य पंच), फर्नांडिस उवेना (सहाय्यक) आणि रिबेलो मारिया पिएडाडे (तांत्रिक निरीक्षक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Three Indian Referees for Afc womens asian cup)

आशिया संयुक्त फुटबाॅल महासंघाशी संलग्न १५ संघटनांमधून १६ मुख्य आणि सहाय्यक पंचांसह एकूण ३२ सामना अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या हंगामासाठी सहभागी संघांची संख्या १२ पर्यंत वाढली असल्यामुळे सामना अधिकाऱ्यांची (Match Refree) गरज अधिक होती. निवड झालेले सर्व सामना अधिकारी प्ले-ऑफसह स्पर्धेतील एकूण २९ सामन्यात आपली भूमिका बजावतील. ‘फिफा’ महिला विश्वकरंडक २०१९ स्पर्धेसाठी यापूर्वी उपखंडातील नऊ सामना अधिकाऱ्यांची निवड झाली होती. त्यांचा अनुभवही आशियातील या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Afc womens asian cup: आशियाई स्पर्धेसाठी तीन भारतीय पंचांची निवड
Viral Photo: अंडे का फंडा! सलग तीन वर्षांपासून एका अंड्याचा फोटो करतोय इंस्टाग्रामवर राज्य

फ्रान्समध्ये २०१९ मध्ये झालेल्या विश्वकरंडक फुटबाॅल (World Cup Football) स्पर्धेसाठी काम पाहिलेल्या ऑस्ट्रेलियाच्या कॅसी रिबेल्ट, केट जेसविच, चीनच्या क्वीन लीआंग, जपानच्या योशिमी यामाशिटा यांच्यासह चीनच्या फॅंग यान, जपानच्या मोकोटो बोझोनो आणि नाओमी तेशिरोगी आणि कोरियाच्या किम क्योंग मि, ली सेऊल गी या सहाय्यक पंचाचाही यामध्ये समावेश आहे.

यातील किम या सर्वात अनुभवी सामना अधिकारी असून, त्या सलग सहाव्या एएफसी महिला आशियाई करंडक स्पर्धेसाठी काम पाहणार आहेत. जपानच्या यामाशिटा, बोझोनो आणि तेशिरोगी या तिघींच्या नावावर ऐतिहासिक कामगिरी नोंद आहे. कारण तिघींनी ‘एएफसी करंडक २०१९’च्या पुरुष क्लब स्पर्धेमध्ये या तिघींनी एकत्रित काम पाहिले होते. पुरुषांच्या सामन्यासाठी एकावेळी तीन महिला सामना अधिकारी असण्याची ही पहिलीच वेळ होती.

प्रथमच व्हिडिओ सहाय्यक रेफ्रीचा वापर

या स्पर्धेत प्रथमच व्हिडिओ सहाय्यक रेफ्रीचा वापर केला जाणार आहे. या साठी सहा अतिरिक्त व्हिडिओ सामना अधिकाऱ्यांची आशिया महासंघाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. याचा उपयोग स्पर्धेतील नवी मुंबई आणि पुणे या दोनच केंद्रांवर केला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com