विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट, चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

अपघाताचा सीआयडीमार्फत तपास सुरु होता.
vinayak mete
vinayak meteSaam Tv
Published On

>> सचिन कदम

रायगड : शिवसंग्रामचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट अपडेट समोर आली आहे. विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला होता.

अपघाताचा सीआयडीमार्फत तपास सुरु होता. सीआयडीने मेटे यांच्या चालकावर विरुद्ध रसायनी पोलिस ठाण्यात सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. एकनाथ कदम असे चालकाचे नाव आहे. (Latest marathi News)

vinayak mete
Palghar : ठाकरे गटाला मोठा झटका; पालघर जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

घटना घडली त्यावेळी घटनेत चालकाची चुकी असल्याचंही बोललं जात होते. वेगाने गाडी चालवत असताना अंदाज न आल्याने गाडी समोर जात असलेल्या ट्रकवर आदळली होती.

vinayak mete
RSS Chief Mohan Bhagwat: देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती 'हिंदू'; RSS प्रमुख मोहन भागवत यांचं वक्तव्य

विनायक मेटे यांचं 14 ऑगस्ट रोजी पहाटे मुंबईला येताना अपघाती निधन झालं होतं. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पहाटे 5:30 वाजता भातान बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली होती. मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिली होती. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पुढील भागाचा चक्काचूर झाला होता.

अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com