Nitin Raut: वीज ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना जाहीर, ऊर्जामंत्र्यांची घोषणा

राज्यात जवळपास 3 लाख 16 हजार 500 ग्राहकांच्या वीज पुरवठा कायमस्वरूपी बंद केलेला आहे.
Nitin Raut
Nitin RautSaam Tv
Published On

बुलडाणा: राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थकीत वीजबिल आणि कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांसाठी "विलासराव देशमुख अभय योजना" जाहीर केली. आज लोणार येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही योजना जाहीर केली. ही योजना 1 मार्च 2022 ते 31 मार्च 2022 पर्यंत लागू असेल (Vilasrao Deshmukh Abhay Yojana announced by Energy Minister Nitin Raut).

या योजनेमुळे राज्यातील बंद पडलेले कृषी, औद्योगिक आणि घरगुती जोडण्या पुन्हा सुरू होऊन राज्यातील कायमस्वरूपी बंद पडलेले उद्योग, कृषी कनेक्शन सुरू होतील, राज्यात रोजगार निर्माण होऊन राज्याच अर्थचक्र सुरळीत होण्यास मदत होईल.

Nitin Raut
...त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज बिल भरने आवश्यक - नितीन राऊत

राज्यात जवळपास 3 लाख 16 हजार 500 ग्राहकांच्या वीज पुरवठा कायमस्वरूपी बंद केलेला आहे. अशा ग्राहकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे उर्जामंत्र्यांनी सांगितलं. राज्यात 9354 कोटी रुपये थकबाकी असून यामुळे राज्याच्या वीज मंडळाचे अर्थचक्र थांबलं असल्याचं नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सांगितलं.

राज्यात आमच्या सरकारच्या काळात 17 हजार कोटी असलेली थकबाकी भाजपाच्या काळात 51 हजार कोटीपर्यंत गेली आणि ती आता 71 हजार कोटी झाली आहे. कोरोना (Corona) काळात महावितरणच्या शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना आज श्रद्धांजली अर्पण करतो, असं नितीन राऊत म्हणाले.

कोरोना काळात केंद्र सरकारने (Central Government) एक रुपयाही दिला नाही. उलट जादा व्याजदर आकारुन मदत देऊ केली असता आम्ही नाकारून खाजगी बँकांकडून कर्ज घेऊन राज्याचा गाडा चालविला. कोरोना काळात आम्ही राज्य अंधारात जाऊ दिले नाही. विलासराव देशमुख अभय योजनेत एकरकमी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना 100 टक्के व्याज माफी आहे, याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असंही त्यांनी सांगतिलं.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com