हिंजवडी ग्रामपंचायतीवर सरपंचाची बिनविरोध निवड

हिंजवडी ग्रामपंचायत मध्ये सतरा सदस्यांची बॉडी आहे. प्रथमच दहा वर्षानंतर गावातील सर्व पक्षीय सदस्यांनी एकत्र येऊन विक्रम साखरे यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ घातली आहे.
विक्रम साखरे
विक्रम साखरेदिलीप कांबळे
Published On

दिलीप कांबळे

पुणे: जगप्रसिद्ध आय टी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीच्या ग्रामपंचायत (Grampanchayat Hinjwadi) सरपंच पदी विक्रम साखरे यांची बिनविरोध निवड झाली. गेल्या पाच वर्ष पूर्वी ग्रामपंचायत बरखास्त करून त्यावर प्रशासनाची निवड करण्यात आली होती त्यानंतर आता विक्रम साखरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

हिंजवडी ग्रामपंचायत मध्ये सतरा सदस्यांची बॉडी आहे. प्रथमच दहा वर्षानंतर गावातील सर्व पक्षीय सदस्यांनी एकत्र येऊन विक्रम साखरे यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ घातली आहे. हिंजवडी म्हटलं की मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होते. त्यामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो चा ही प्रस्ताव पास झाला आहे.

ही मेट्रो लवकरात लवकर पूर्ण करण्यास मी कटिबद्ध आहे. हिंजवडीत कचरा आणि पाण्याची ही मोठी समस्या आहे. ति दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे असे मत नवनिर्वाचित सरपंच विक्रम साखरे यांनी व्यक्त केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com