महाविकास आघाडी सरकार निद्रिस्त अवस्थेत गेलं आहे; विखे पाटलांची टीका
महाविकास आघाडी सरकार निद्रिस्त अवस्थेत गेलं आहे; विखे पाटलांची टीकाSaam TV

महाविकास आघाडी सरकार निद्रिस्त अवस्थेत गेलं आहे; विखे पाटलांची टीका

केंद्र सरकारकडे बोट दाखवण्या पेक्षा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा
Published on

नांदेड - राज्यसरकार निद्रीस्त अवस्थेत गेलं असल्याची टीका भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील BJP Leader Radha Krishna Wikhe Patil यांनी महाविकास आघाडी सरकारवर MVA Goverment केली आहे. केंद्र सरकारकडे बोट दाखवण्या पेक्षा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, नुकसान झालेल्या खरीप पिकांना भरीव मदत द्या अशी मागणी ही विखे पाटील यांनी केली आहे. (Vikhe Patil's criticism of 'MVA' government)

हे देखील पहा -

उत्तरप्रेदेश UP मधील लखीमपूर Lakhimpur येथील शेतकऱ्यांच्या हत्याप्रकरणावरुन केंद्रातील सत्ताधारी भाजपला सर्व विरोधकांनी चांगलेच घेरले आहे अशातच राज्यातील नेत्यांनी देखील योगी आणि मोदी सरकारवरती निशाना साधला आहे. संजय राऊत जयंत पाटील आणि छगन भुजबळ अशा दिग्गज नेत्यांनीच केंद्रावरती निशाना साधल्याने भाजपनेते देखील आपल्या पक्षाच्या बचावाला धावल्याचं चित्र समोर येत असून महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्राकडे बोट दाखविण्यापेक्षा तेथील शेतकऱ्यांची काळजी करण्यापेक्षा राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे.

महाविकास आघाडी सरकार निद्रिस्त अवस्थेत गेलं आहे; विखे पाटलांची टीका
एखाद्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला ED ची नोटीस आली तर आश्चर्य वाटायला नको - यशोमती ठाकूर

अशातच आता हे महाविकास आघाडी सरकार निद्रिस्त अवस्थेत गेलं असून त्यांनी केंद्राकडे बोट दाखविन्या पेक्षा राज्यातील शेतकऱ्यांना मदत करावी असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. विखे पाटील आज माहुर येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तर आपण देवीकडे "या सरकारला सुबध्दी दे असे साकडे घातले" आहे असं सांगत महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com