अमरावती - उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या नातेवाईकांवर आज आयकर विभागाने Income Tax Department केलेल्या कारवाईबाबत पत्रकारांनी विचारले असता महिला व बालकल्याण मंत्री ॲड यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या हे सगळं फार धक्कादायक असून राजकारणी लोकांना कुटुंब नसतं का? देशाच्या संस्कृतीला अशोभनीय असं खुनशी राजकारण मागील सात वर्षापासून सुरु झालं आहे. उद्या अचानक एखाद्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला ED ची नोटीस आली तर आश्चर्य वाटायला नको. इतक्या खालच्या पातळीवर जाउन ED, आयकर अशा यंत्रणांचा राजकीय वापर सुरु असून याचा आपण निषेध करत असल्याचं त्या म्हणाल्या. (Don't be surprised if a sarpanch gets a notice from the ED - Yashomati Thakur)
हे देखील पहा -
आज सकाळपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई करण्यात येत होती. या मध्ये जरंडेश्वरचसह दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या सर्व खासगी साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात आली हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या जवळच्या व्यक्तींचे असल्याचं म्हंटलं जात आहे.
मात्र हे प्रकरण तापलं ते म्हणजे अजित पवारांच्या बहीण विजया पाटील Ajit Pawar Sister Vijaya Patil यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवरती प्राप्तिकर विभागाने छापा टाकला तेंव्हापासून. आयकरच्या अधिकाऱ्यांकडून मुक्ता पब्लिकेशनमध्ये Mukta Publications छापा टाकल्यानंतर विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील घरावर देखील आयकरचे अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यावरती त्यांनी यशोमती ठाकूर यांनी वरिल प्रतिक्रिया दिली.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.