क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी भाजपाचा काहीतरी डाव; सचिन सावंत यांचा गंभीर आरोप

एका खासगी, भाजप पदाधिकऱ्याच्या हातात कस्टडी दिलीच कशी...
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी भाजपाचा काहीतरी डाव; सचिन सावंत यांचा गंभीर आरोप
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी भाजपाचा काहीतरी डाव; सचिन सावंत यांचा गंभीर आरोपSaamTV
Published On

मुंबई : गुजरात मध्ये आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अमंली पदार्थाचा साठा जप्त झाला, पैसे दिल्याशिवाय हा साठा अफगाणिस्तान मधून आला का ? माध्यमांमधून देखील अचानक हा विषय गायब झाला असे अनेक प्रश्न उपस्थित करत क्रूझ ड्रग्ज Cruise drugs प्रकरणामध्ये केंद्रातील सत्ताधारी Central Goverment पक्षाचा काहीतरी डाव असण्याची शक्यता आहे असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत Sachin Sawant यांनी केला आहे. (Some intrigue of the BJP in the cruise drugs case; Serious allegations by Sachin Sawant)

हे देखील पहा -

सचिन सावंत म्हणाले काल दोन वाक्य NCB च्या अधिकाऱ्यांनी वापरली कायद्याच्या अनुषणगाने आणि नियमाला धरून हे काम केलंय सगळी प्रक्रिया पारदर्शक होती, तशी कारवाई होत आल्याचे शब्द त्यांनी वापरले याच शब्दांवर आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करतोय सगळं प्रकारण सारवा सारव करण्यासाठी झालाय का ? आमच्या सहयोगी पक्षाने काल समोर आणलेल्या गोष्टी गंभीर आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रना National Investigation Agency भाजपच्या अजेंड्यासाठी काम करत आहेत का असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित करत नियमबाह्य वागणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सावंतानी केली कायद्याची आठवण

सचिन सावंत यांनी अंमली पदार्थ कायदा अमंलबजावणी अधिकारी कोणत्याही कामाला जायचा असेल, तसेच अटक केलेला आरोपी घेऊन जायचं असेल तर त्याला दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपवायला हवं, आणि त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहमती असली पाहिजे, त्यावर दोन्ही अधिकाऱ्यांच्या सही हव्यात,असं लेट डाऊन प्रोसिजर हे NCB करिता पूर्णपणे NCB च्या हॅन्डबुक मध्ये असून त्यातल्या ६९ पानावर लिहिलंला वरील मजकूर आहे. असं असताना एका खासगी, भाजप पदाधिकऱ्याच्या हातात कस्टडी दिलीच कशी असा सवाल सावंत यानी उपस्थित केला आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी भाजपाचा काहीतरी डाव; सचिन सावंत यांचा गंभीर आरोप
आर्यन खानवरील कारवाई संशयास्पद; छगन भुजबळांचा गंभीर आरोप!

अन्यथा NCB वर प्रश्नचिन्ह निर्माण होईल -

तसेच आरोपीला ज्याने अटक केली, त्या अटक झालेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर सादर करायला हवं, ज्याने अटक केलीय , तोच अटक करू शकतो, आणि त्याच्याकडे कस्टडीCustody हवी , त्याचीच जबाबदारी आरोपीच्या सुरक्षिततेचि असेल असं असताना त्या आरोपलीला आपण सेल्फी Selfie घेताना पाहिलं आहे. त्यामुळे तो आरोपी सुरक्षित आहे का ? अश्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. ज्या अधिकाऱ्याकडे आरोपी आहे, त्याने नियमांचा उल्लंघन केल्यास त्याच्यावर 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आणि 1 लाख रुपयेकिमान दंड घेतला जावा अशी तरतूद कायद्यामध्ये आहे सेक्शन 85 प्रमाणे त्याच्याकडून चूक झालेली आहे, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी NCB च्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई लवकर करावी अशी मागणी यावेळी सावंत यांनी केली आहे. आणि जर NCB चे वरिष्ठ अधिकारी यावर कारवाई केली नाही तर NCB च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतील असं सावंत म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com