कोरोना रुग्ण वाढल्यास निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचे स्पष्ट संकेत

राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv
Published On

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. कोरोनापासून (Corona) बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. दुसरीकडे राज्यात महापालिका निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू असून रुग्णसंख्या वाढत आहे. अशातच कोरोना रुग्ण वाढल्यास निवडणुका पुढे ढकल्याव्या लागतील. असे विधान राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केलं आहे.

Uddhav Thackeray
Rajyasabha Election : निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मविआ नेते घेणार फडणवीसांची भेट

राज्यासाठी पुढील 8 ते 10 दिवस महत्वाचे आहेत. निवडणुकीला अजून वेळ आहे. मात्र परिस्थिती उद्भवली तर निवडणूक आयोगाला विनंती करावी लागेल, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. नागपुरात माध्यमांसोबत बोलतांना त्यांनी हे विधान केलं आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसंदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले की, "राज्यसभा निवडणुकांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सामान्य जनतेला यांच्याशी काही देणे-घेणे नाही. भलत्याच गोष्टीकडे आम्ही चाललो. निवडणूक बिनविरोध व्हावी. लोकप्रतिनिधी या संदर्भात भावना बदलत असतात. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी असा आमचा प्रयत्न आहे".

Uddhav Thackeray
सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट; म्हणाले...,

केंद्राने काश्मीरबाबत कडक भूमिका घ्यावी.

काश्मीरमध्ये दररोज होणाऱ्या हिंदुंच्या हत्येसंदर्भात सुद्धा वडेट्टीवार यांनी विधान केलं आहे. काश्मिरी पंडितांचा मुद्दा आपण पाहिला आहेत. त्या काळातील परिस्थिती निवळले होती. पर्यटक जात होते. हे हल्ले केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. केंद्राने कडक भूमिका घ्यावी. उपयोजना करावी, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

निवडणुक बिनविरोध होणार?

महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज (शुक्रवारी) विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी ही भेट घेणार आहे. यावेळी छगन भुजबळ, अनिल देसाई, सुनिल केदार, सतेज पाटील हे मविआ फडणवीसांची भेट घेणार आहेत. राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हे नेते फडणवीसांशी चर्चा करणार आहेत. आज राज्यसभेच्या निवडणुकीच्या अर्जमाघारीचा शेवटचा दिवस आहे. भाजपने आपला अतिरिक्त उमेदवार धनंजय महाडिक यांचा अर्ज भरला असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. त्यामुळे फडणवीसांची मनधरणी करण्यासाठी मविआ नेते फडणवीसांशी चर्चा करणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com