Eknath Khadse : लाडक्या बहिणींनो महायुतीला मत दिल्यास 200 रुपयांचं तेल खावं लागेल; एकनाथ खडसेंचा सरकारवर निशाणा

Vidhansabha Election 2024 : महायुतीला मत दिल्यास दोनशे रुपयांचं तेल खावं लागेल, असं एकनाथ खडसेंनी लाडक्या बहिणींना सांगितलं आहे.
महायुतीला मत दिल्यास दोनशे रुपयांचं तेल खावं लागेल, असं एकनाथ खडसेंनी लाडक्या बहिणींना सांगितलं आहे.
Eknath KhadseSaam tv
Published On

महायुतीला मत दिल्यास लाडक्या बहिणींना दोनशे रुपये किलो या किंमतीने तेल खावे लागेल अशी टीका माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. दहा, पंधरा, वीस रुपयांची वाढ करणे ठीक आहे. मात्र थेट शंभर रुपयांवरून दीडशे रुपये किलो तेलांची किंमत केल्यास सामान्यांच्या खिशाला हे परवडणारे नाही. त्यामुळे या सरकारला लाज वाटायला पाहिजे अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

महायुतीला मत दिल्यास दोनशे रुपयांचं तेल खावं लागेल, असं एकनाथ खडसेंनी लाडक्या बहिणींना सांगितलं आहे.
VidhanSabha Update : महायुती सत्तेचं समीकरण कस जुळवून आणणार ?

सध्या राज्यात महागाईचा भडका उडाला आहे. इंधनासह, रोजचा भाजीपाला आणि तेलाच्या किंमती मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. या सर्वांत महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली.

लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांना लाभ देखील मिळाला. मात्र ही योजना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यावरून आणि वाढलेल्या महागाईवरून खडसेंनी लाडक्या बहि‍णी असा उल्लेख करत महायुतीला मत दिल्यास काय होईल याची आठवण करून दिली आहे.

महागाईला आळा घालणं हे सरकारचं काम आहे. मात्र सरकार फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे. या फोडाफोडीमुळे त्यांनी अमाप पैसा कमवण्याचा गंभीर आरोप ही एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

महायुतीला मत दिल्यास दोनशे रुपयांचं तेल खावं लागेल, असं एकनाथ खडसेंनी लाडक्या बहिणींना सांगितलं आहे.
Vidhansabha Election 2024 : राज ठाकरेंचे दोन शिलेदार ठरले, एक उद्धव ठाकरे, तर दुसरा भाजपविरोधात, कोण मारणार बाजी?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com