Satyajeet Tambe: फडणवीसांचं 'ते' वक्तव्य अन् तांबे कुटुंबियांची खेळी; महिनाभरात पडद्यामागे नेमकं काय घडलं?

सगळ्या घडामोडी एका दिवसात घडल्या असं शक्य नाही. त्यामुळे पडद्यामागे काही हालचाली झाल्या हे नक्की.
Devendra fadanavis
Devendra fadanavisSaam TV

Vidhan Parishad Election 2023: नाशिक पदवीधर निवडणुकीत आज मोठ्या नाट्यमय घटना पाहायला मिळाल्या. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र सुधीर तांबे यांनी मुलासाठी अर्जच दाखल केला नाही. तर सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करत मोठी खेळी केली. दुसरीकडे काँग्रेसने देखील येथे उमेदवार दिला नाही. त्यामुळे सत्यजित तांबे बिनविरोध निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या सगळ्या घडामोडी एका दिवसात घडल्या असं शक्य नाही. त्यामुळे पडद्यामागे काही हालचाली झाल्या हे नक्की. (Mahavikas Aghadi)

Devendra fadanavis
Satyajeet Tambe: भाजपाचा शेवटच्या क्षणी दे धक्का! महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेना पाठींबा?

नाशिक पदवीधर निवडणुकीत आज जे घडलं त्याचा घटनाक्रम देखील समजून घेणं महत्त्वाच आहे. गेल्या महिन्यात ७ डिसेंबर रोजी सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तेथे त्यांना सत्यजित तांबे यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. त्यावेळी त्यांना सत्यजित तांबे यांना संधी मिळाली पाहिजे असे संकेत दिले होते. इतक्या चांगल्या तरुण नेत्याला संधी द्या,नाहीतर आमचे लक्ष आहे, असं स्पष्टच देंवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

नाशिक विधानपरिषदेत डॉ. सुधीर तांबे हे सध्या आमदार आहेत. काँग्रेस त्यांनाच उमेदवारी देणार हे स्पष्ट असताना सत्यजित तांबे भाजप संपर्कात असल्याची चर्चा सुरु होती. भाजपकडून सत्यजित तांबे यांना उमेदवारी मिळेल अशी देखील माहिती मिळत होती. त्यामुळे दुसरीकडे दबावतंत्राचा वापरदेखील तांबेंकडून सुरु होता.

त्यानंतर आज १२ जानेवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आज महत्त्वाच्या दिवशी तांबे कुटुंबीयांची मोठी राजकी खेळी केली. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली असताना सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तसेच यावेळी सत्यजित तांबे यांनी भाजपसह सर्वपक्षिय पाठिंबा देखील मागितला आहे. दुसरीकडे काँग्रेसचा उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याने सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय उरला नाही.

Devendra fadanavis
Satyajeet Tambe: नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट; सत्यजित तांबेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपकडून अधिकृत उमेदवारी कुणीही नाही. त्यामुळे नाशिक विधानपरिषद बिनविरोध होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडीमुळे सत्यजित तांबे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणले आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत मेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १६ जानेवारी आहे. त्यामुळे १६ जानेवारीपर्यंत स्पष्ट सगळं चित्र होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com