Padalkar vs Awhad Clash : विधानभवनात हाणामारी करणारा पडळकरांचा कार्यकर्ता नेमका कोण?

Gopichand Padalkar vs Jitendra Awhad Clash : विधान भवनाच्या लॉबीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. या हाणामारीच्या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
Gopichand Padalkar vs Jitendra Awhad Clash
Gopichand Padalkar vs Jitendra Awhad ClashSaam Tv
Published On

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. विधान भवनाच्या लॉबीमध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले. या दोन्ही नेत्याचे कार्यकर्ते एकमेकांना कसे मारत आहे याचे व्हिडीओ समोर आले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांच्या कार्यकर्त्याने पहिला हात उचलला असल्याचे म्हटले आहे. आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता कोण?

Gopichand Padalkar vs Jitendra Awhad Clash
Jitrendra Awhad : विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल तर... विधान भवनातील हाणामारीवर जितेंद्र आव्हाडांच्या संतापाचा कडेलोट

जितेंद्र आव्हाड यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला, नितीश देशमुख याला गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने मारहाण केली. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव हृषिकेश टकले असे आहे. टकले हा गोपीचंद पडळकर यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. हृषिकेश टकलेवर जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

मी दिलगिरी व्यक्त करतो, गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया

विधान सभेच्या प्रागंणामध्ये जी घटना घडली आहे, ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. विधान सभेचा सदस्य म्हणून या घटनेचे मला दु:ख आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्याअंतर्गत हा सर्व परिसर येतो. घडलेल्या घटनेविषयी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आमचे नेतेमंडळी यांच्याशी चर्चा करुन तुमच्याशी बोलतो, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

हाणामारीवर काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

या एकूण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या अखत्यारीत हा संपूर्ण परिसर येतो. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेणे त्यांचे कर्तव्य आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक या परिसरात जमून जर हाणामारी करत असतील, तर ती गोष्ट राज्याच्या विधीमंडळाला न शोभणारी आहे. अशा घटनांमुळे सभागृहाची प्रतिष्ठा धोक्यात येते. त्यामुळे संबंधितांवर योग्य ती आणि तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे', असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Gopichand Padalkar vs Jitendra Awhad Clash
Pune Accident : पुण्यात एसटी बसचा भीषण अपघात, खराब रस्त्यावरुन घसरली अन् बस थेट गटारात कोसळली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com