बुलडाणा : मोताळा नगरपालिकेतील बाजार वसुली हराशीची तारीख गेल्या दोन महिन्यांपासून संपलेली आहे, तरीही विना परवानगी काँग्रेसचे नगरसेवक (Congress Corporator) बाजारातील भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांकडून अवैध कर वसुली करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) वायरल झाला आहे.
अवैध वसुली करणाऱ्या काँग्रेसचे (Congress) नगरसेवकांच्या विरोधात शिवसेनेच्या नगरसेवकांनी मोताळा तहसीलदार व पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे लेखी तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे, जिल्हा प्रशासनाने जर दखल घेऊन कारवाई केली नाही तर जनआंदोलन करू असा इशारा शिवसेनेच्या (Shivsena) नगरसेवकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.