बीड - बीड (Beed) जिल्हा परिषदच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा लेखाअधिकारी, अ.व.बुरांडे यांचा टेबलवर बसून पैसे घेतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अधिकारी बुरांडे हे टेबलवरील फाईल सारतात आणि एक व्यक्ती टेबल वर पैसे ठेवतो. फाईलवर पैसे ठेवल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही, अशीच काही परिस्थिती बीडमध्ये पाहायला मिळत आहे.
हे देखील पहा -
त्यामुळे सरकारी कार्यालयात अधिकारी पैसे घेऊन कामे करतात, हे यातून दिसून येत आहे. यामुळे एकूणच बीड जिल्हा परिषद मधील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यासंदर्भात लेखाधिकारी बुरांडे यांना विचारले असता, मी कधी कोणाकडून पैसे घेतले आहेत, मला आठवत नाही. मात्र माझा खाजगी व्यवहार असू शकतो. असं फोनवरून सांगितल.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये विकास कामाच्या फाईल पुढे सरकण्यासाठी अधिकारी टेबलवर पैशाची मागणी करतात व ते पैसे स्वीकारताना देखील दिसून येत आहेत. त्यामुळे नेमका बीड जिल्ह्यामध्ये फाईलवर वजन ठेवल्याशिवाय कुठली फाईल पुढे सरकत नसल्याचे बोलले जात आहे. एकंदरीतच भ्रष्टाचाराचे कुरण झालेल्या या सर्व कार्यालयामध्ये अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.