विजय पाटील
सांगली जि्ल्ह्यातील पलूसमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माता-बालक पोषण आहारात चक्क मृत वाळा साप आढळल्यामुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे शासन माता आणि बालकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप होत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना पोषण आहार पाटप करण्यात आला होता.
गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्षांपर्यतच्या बालकांना शासनाच्यावतीने पोषण आहार दिला जातो. दरम्यान पलूस येथे अंगणवाडीमधून गर्भवीत माता-बालकांना पोषण आहाराचं वाटप करण्यात आलं होतं. त्या डाळ,तांदूळ ,तिखट,मीठ एकत्र असणाऱ्या पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये मृत वाळा साप आढळून आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. या प्रकारानंतर अंगणवाडी सेविकांना आहार वाटप न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकात्मिक बालविका योजनेअंतर्गत गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्षे पुरवला जातो. यामध्ये या अगोदर हरभरा तांदूळ तूरडाळ गहू तिकट मीठ विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या. परंतु गेल्या एप्रिल महिन्या पासून तयार म्हणजेच डाळ तिकट मीठ एकत्रित करून तसेच गव्हाचे पीठ साखर एकत्रित करून आहार नवीन ठेकेदार नवीन कंपनीस दिला आहे. नुकताच एप्रिल व मे महिन्याचा पोषण आहार पलूस येथील बिटला पोहोच करण्यात आला. काही लाभार्थ्यांनी आहार घरी घेवून गेल्यावर येथील कृषिनगर अंगणवाडी क्रमांक 116 येथून येथील लाभार्थी माझी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष याच्यासाठी आहार घरी नेला होता व तो पॅकींग फोडला आसता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील साप आढळला.
त्यांनी तत्काळ संबधित अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधला.संबधित अंगणवाडी सेविकाने वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधला व ही बाब निदर्शनास आणून दिली. व पोषण आहार वाटप केलेल्या लाभार्थ्यांची संपर्क साधून सदर आहार परत जमा करून घेण्यात आला. व पलूस परिसरातील अंगणवाडी सेविकांनी मीटिंग घेवून सदर आहार न वाटण्याचा निर्णय घेतला.
मार्च महिन्याआधी शासनामार्फत पुरवला जाणारा माता बालक पोषण आहार हा अतिशय चांगल्या प्रतीचा स्वच्छ निवडक दिला जात होता. परंतु गेल्या मार्च महिन्यापासून मुंबई येथील नवीन कंपनीस ठेका राज्य शासनाने दिला परंतु सदर कंपनीने जुन्या पद्धतीने आहार न देता तयार आहार देण्याचा देण्यास सुरुवात केली. दरम्यान राज्य शासनाने पूर्वीप्रमाणे आहार द्यावा व सध्या पलूस येथील कृषीनगर अंगणवाडीमध्ये सापडलेल्या मृत सापाचे पिल्लू पिशवीत कसे आले. याची सखोल चौकशी करा व संबंधित दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.