Vidarbha Temperature: विदर्भात अवकाळी पावसानंतर आता उन्हाचा तडाखा! तापमान 45 पार जाण्याची शक्यता

Weather Forecast Latest Update: एप्रिलमध्ये विदर्भात 43 अंशावर गेलेलं तापमान 35 अंशावर खाली येऊन हवेत गारवा निर्माण झाला होता.
Vidarbha Temperature
Vidarbha Temperaturesaam tv
Published On

Vidarbha Weather Forecast : विदर्भात एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला पावसाने झोडपल्यानंतर आता मात्र खऱ्या उन्हाळ्याला सुरुवात झालीय. विदर्भात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते. त्यामुळं आता तापमान 45 अंशावर जाण्याचा इशारा हवामान खात्यानं व्यक्त केलाय.

यंदा एप्रिल महिन्याच्या मध्यात विदर्भाचं तापमान 43 अंशावर गेलं होतं. यंदाचा उन्हाळा चांगलाच तापणार असा अंदाज होता. मात्र अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस सुरू झाला. जवळपास 15 दिवस सलग पाऊस पडला. यादरम्यान विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट झाली. यामुळे विदर्भात 43 अंशावर गेलेलं तापमान 35 अंशावर खाली आलं आणि हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यामुले काही दिवस उन्हाच्या चटक्यांपासून नागरिकांना दिलासा मिळाला होता.

Vidarbha Temperature
Beed News: ना बिडी, ना दारु, 'या' गावात साधी चहाची टपरीही नाही! व्यसनांपासून चार हात लांब; आदर्श गावाची होतेयं राज्यात चर्चा

विदर्भातील तापमान 45 अंशावर जाणार!

एप्रिल महिन्यात वाढलेल्या तापमाणानंतर गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक पाऊस आणि थंड दिवसांची नोंद झाली. मात्र, आता पावसाळी वातावरण निवळलंय, त्यामुळं पुन्हा उन्हाचा पारा चढायला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत विदर्भातील तापमान 45 अंशावर जाईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम

मोचा चक्रीवादळ (Mocha Cyclone) आज पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना अलर्ट दिला आहे. महाराष्ट्रात विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे.

Vidarbha Temperature
Maharashtra Rain Alert: ‘मोचा’ चक्रीवादळामुळे राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना अलर्ट

विदर्भात वादळी-वाऱ्यासह अवकाळी पाऊस

विदर्भ आणि छत्तीसगड भागात आज मुसळधार पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस (Rain Alert) पडेल असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडत आहे, तर राज्यातील काही ठिकाणी गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे.

मान्सूनबाबत आली मोठी अपडेट

यंदा देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज सोमवारी स्कायमेटनं वर्तवला होता. मात्र आता हवामान तज्ज्ञांनी एक चिंता व्यक्त केली आहे. राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हीच स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Edited By - Chandrakant Jagtap

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com