Maharashtra Politics: ...तर आम्ही सदैव तुमच्यासोबत असू...; पापक्षालनाबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोहन भागवंतांना मोठं आवाहन

Prakash Ambedkar Latest News : पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास सर्वच आंबेडकरी विचारणा मानणाऱ्या संघटना आणि पक्ष ह्या धम्म सभेत मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या.
Prakash Ambedkar Vs Mohan Bhagwat
Prakash Ambedkar Vs Mohan BhagwatSaam TV
Published On

Balasaheb Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पिंपरी-चिंचवड शहरात भव्य धम्म सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) उपस्थितांना मार्गदर्शन तर केलंच, सोबत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या 'त्या' वक्तव्यावरही भाष्य केलं आहे. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना जर खरचं पापक्षालन करायचं असेल तर तुम्ही जाहीरपणे मनुस्मृतीचं दहन करा तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं पापक्षालन केलं असं आम्ही समजू आणि आम्ही सदैव तुमच्या सोबत असू असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी आपल्या भाषणातून केलं आहे. (Prakash Ambedkar Latest News)

पाहा व्हिडिओ -

पिंपरीतील हिंदुस्तान बायोटिकच्या ग्राऊंडवर ही भव्य धम्म सभा आयोजित करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास सर्वच आंबेडकरी विचारणा मानणाऱ्या संघटना आणि पक्ष ह्या धम्म सभेत मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रकाश आंबेडकर हे यांनी ह्या धम्म सभेला संबोधित करताना अनेक मोठी वक्तव्य केली आहेत. आपल्या भाषणात ते म्हणाले की, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर पापक्षालन करण्याची वेळ आली, ती ह्या धम्मसभेमुळे आली. (Maharashtra News)

Prakash Ambedkar Vs Mohan Bhagwat
Gram Panchayat Election 2022: राज्यातल्या ११६६ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; १७ ऑक्टोबरला निकाल

आपलं भांडण कोणत्या जाती किंवा धर्माशी नाही तर आमचं भांडण इथल्या मनुवादी व्यवस्थेशी आहे. कारण ती व्यवस्था गुलामगिरीवाली व्यवस्था आहे. शोषण करणारी व्यवस्था आहे. मोहन भागवत यांना जर खरचं पापक्षालन करायचं असेल तर तुम्ही जाहीरपणे मनुस्मृतीच दहन करा तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं पापक्षालन केलं असं आम्ही समजू आणि आम्ही सदैव तुमच्या सोबत असू असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

यावेळी त्यांनी मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवरही टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले, जगाचं नेतृत्व आपल्याकडे आलं असं भासवल जात आहे. अजून ३० दिवस थांबा आपल्या देशाची अर्थ्यवस्था ढासळू लागेल, डॉलरची किंमत वाढू लागेल. रुपयाची किंमत कमी होईल कारण आपल्या देशात नीट सामाजिक धोरण नाही आणि नीट आर्थिक धोरणही नाही.

Prakash Ambedkar Vs Mohan Bhagwat
Shivsena Symbol News: शिवसेनेच्या 'मशाल'नंतर आता 'ढाल-तलवार'ही वादात; शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हावर शीख समाजाचा आक्षेप

२०१४ पासून आठ लाख लोकांनी आपल्या देशाची नागरिकता सोडली आहे. या ज्या आठ लाख लोकांनी आपल्या देशाची नागरिकता सोडली ते प्रत्येक लोक १०० कोटींचे मालक आहेत. हे देशाची नागरिकता सोडणारे लोक इतर कोणत्या धर्माचे नाही, तर नागरिकता सोडणाऱ्या लोकांमध्ये हिंदू धर्मियांचा मोठा समावेश आहे. १०० कोटींचे मालक असलेल्या लोकांनादेखील आपल्या देशात ब्लॅकमेल केलं जातं आहे, म्हणून ते आपल्या देशाची नागरिकता सोडत आहेत असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com