"जरा काही सांगितलं म्हणून वसंत मोरेंना पक्षातून काढलं, ते हिंदूच होते ना?"

'मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 4 महिने 6 महिन्यांनी उगवतात, किमान लोकांच ऐकून तरी घ्या; वसंत मोरे तर हिंदूच होते ना'
Vasant More
Vasant MoreSaam Tv
Published On

सोलापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 4 महिने 6 महिन्यांनी उगवतात, किमान लोकांच ऐकून तरी घ्या; वसंत मोरे तर हिंदूच होते ना असा सवाल करत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज यांच्यावर टीका केली आहे. ते आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा बैठकीत बोतत होते.

यावेळी ते म्हणाले, 'वसंत मोरे (Vasant More) यांनी जरा काही सांगितलं तर त्यांना पक्षातून काढुन टाकलं, राज ठाकरे हे 4 महिने 6 महिन्यांनी उगवतात किमान लोकांच ऐकून तरी घ्या; वसंत मोरे तर हिंदूच होते ना? असा सवाल करत त्यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. तसंच राजसाहेब ठाकरेंना निवडणूक आल्यानंतर कंठ फुटलाय, ईडीने एक पट्टी पाढवल्यांनंतर राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) इंजिनाचा ट्रॅक बदलला असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Vasant More
Breaking: वसंत मोरे यांना सेनेत घेण्यास खुद्द उद्धव ठाकरेच उत्सुक

दरम्यान, समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (NCP) एकत्रित येऊन यापुढे एकत्रपणे काम करायचंय आहे. 11 तारखेला महात्मा फुलेंची जयंती आहे. 14 एप्रिल ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. हे सर्व आपले खरे देव आहेत. जनावरासारखी वागणूक मिळणाऱ्यांना माणसात आणलं आहे. या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार करा शेवटी जे विचार टीकतील ते फुले,शाहू,आंबेडकर यांचे विचार टीकतील असही ते या बैठकीत म्हणाले. तसंच जातीं जातीत अडकून राहू नका असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com