महेंद्र वानखेडे
वसई : वसई- विरार महानगरपालिका हद्दीतील नालासोपारा, वालीव व पेल्हार प्रभागात असंख्य अनधिकृत इमारती व औद्योगिक गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम केले जातं आहे. (Vasai Virar News) कारवाई होत नसल्याने पालिका मुख्यालय परिसरात नानासाहेब कोळेकर या सामाजिक कार्यकर्ता तरुणाने पालिकेचा प्रतिकात्मक अंत्यविधी करून भर उन्हात तिरडीवर झोपून आंदोलन सुरु केले आहे. (Latest Marathi News)
वसई- विरार महानगरपालिका (Vasai Virar Corporation) हद्दीतील नालासोपारा, वालीव व पेल्हार प्रभागात असंख्य अनधिकृत इमारतींचे काम चालू आहे. मात्र त्याचे कोणतेही सोयरे सुतक पालिका अधिकाऱ्यांना नसून आर्थिक फायद्यासाठी प्रशासन या बांधकामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी लावण्यात आला. यामुळेच महानगर पालिकेचा अंत्यविधी करून हे आंदोलन करण्यात आले. पालिका आयुक्त अनिल कुमार पवार, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे व इंजिनियर यांचे फोटो बॅनरवर लावण्यात आले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तरुण झोपला तिरडीवर
महापालिकेकडून कारवाई होत नसल्याने या विरोधात तरुणाने आंदोलन केले आहे. या आंदोलनात तरुण तिरडीवर झोपून होता. दरम्यान शुक्रवारी सकाळपासून भर उन्हात सुरु असलेलय या आंदोलनाकडे अनेक नागरिकांच्या नजरा वळाल्या होत्या..
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.