रायगड: बोडणी गावात नावालाच नळ पण पाण्यासाठी गावभर नुसती धावपळ!

40 वर्षांपासून करोडोच्या विविध पाणी योजना धूळखात
Water Crises in Bodni
Water Crises in Bodniराजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड : शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येकाला 50 लिटर शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन दिले असताना अलिबाग (Alibaug) तालुक्यातील बोडणीकरांना मात्र एका हंडा पिण्याच्या पाण्यासाठी गेली 40 वर्षांपासून धावाधाव करावी लागत आहे. गावात पाणी योजनेसाठी करोडो रुपये खर्चूनही बोडणीकर हे पिण्याच्या पाण्यापासून तहानलेलेच आहेत. गावात नळ असले तरी नळाला पाणी नसल्याने बाहेरच्या गावात किंवा रस्त्यावरील एमआयडीसीच्या (MIDC) नळावर जाऊन पाणी भरावे लागत आहे. पाणी मिळविण्यासाठी महिला वर्गाला रोजच मारामारी करावी लागत असल्याने आम्हाला पाणी कधी मिळणार ? असा प्रश्न महिला वर्गाकडून विचारला जात आहे. जिल्हा परिषद प्रशासन बोडणीकरांचा पाणी प्रश्न सोडविण्यात सपशेल फेल ठरले आहे. (Raigad News In Marathi)

Water Crises in Bodni
Raigad: समुद्रात अचानक आले वादळ, नौका दगडावर आपटून फुटली अन्...

महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण;

अलिबाग तालुक्यात पाणी प्रश्न (Water Crises) हा तसा गंभीर नाही. मात्र रेवस परिसरातील बोडणी आणि परिसरातील गावात गेली अनेक वर्ष ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहिली आहे. रेवस ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी प्रश्न सोडविण्यासाठी योजना राबवली. गावात तीन टाक्याही बांधल्या आहेत. मात्र या टाक्या अद्यापही रिकाम्याच असून केलेला खर्चही वाया गेला आहे. गावात विहीर (Well) असूनही त्यात अशुद्ध पाणी असल्याने त्याचा वापर होत नाही. नळ घरोघरी असूनही ते कोरडेच आहेत. त्यामुळे महिला वर्गाला पिण्याच्या पाण्यासाठी दिवस रात्र वणवण करावी लागत आहे. मिळणारे पाणी हे कधी एक दिवस तर कधी आठ दिवसाने मिळत असल्याने विकत पाणी घ्यावे लागत आहे. (Latest Marathi News)

हे देखील पहा -

निवडणूक झाली की पुन्हा जैसे थे परिस्थिती;

पाणी आल्यानंतर घरातील हंडा, बाटल्या, ड्रम घेऊन महिला वर्ग गावाच्या बाहेरील नळावर धाव घेतात. पाणी मिळविण्यासाठी मग झगडे होतात. येणारे पाणी हे दोन ते तीन तास ते पण कधी रात्री अपरात्रीही येत असते. त्यामुळे महिला वर्गाला आपली बाकीची कामे टाकून पाण्यासाठी धावपळ करावी लागते. बोडणीचा पाणी प्रश्न ना लोकप्रतिनिधी ना प्रशासन सोडवत आहे. निवडणुकी काळात गावात पाणी मुबलक मिळते आणि निवडणूक झाली की पुन्हा जैसे थे परिस्थिती असते असे महिला वर्गाचे म्हणणे आहे. आंदोलन, मोर्चे काढूनही बोडणीकरांचा पाणी प्रश्न अधुराच राहिला आहे. त्यामुळे 55 लिटर प्रत्येकी पाणी नको कुटूंबाला तरी तेव्हढे दिलेत तरी चालेल अशी बोलण्याची वेळ या बोडणीकरावर आली आहे. (Water Crises in Bodni)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com