Raigad: समुद्रात अचानक आले वादळ, नौका दगडावर आपटून फुटली अन्...

दहा ते पंधरा लाखाचे नुकसान
Raigad: समुद्रात अचानक आले वादळ, नौका दगडावर आपटून फुटली अन्...
Raigad: समुद्रात अचानक आले वादळ, नौका दगडावर आपटून फुटली अन्...राजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड : श्रीवर्धन समुद्रात रविवारी अचानक आलेल्या वादळ वाऱ्याने जीवना बंदरातील एक मच्छीमार नौका भरकटुन दगडावर आपटून फुटली. नौकेतील चार खलाशी मृत्यूशी झुंज देत किनाऱ्यावर आल्याने बालबाल बचावले. मात्र नौका बुडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

रविवारी 23 जानेवारी रोजी पाकिस्तान मधून आलेल्या धुळीच्या वादळाचा फटका श्रीवर्धन जीवना बंदरातील लक्ष्मी विजय मच्छीमार नौकेला बसला आहे. (Latest Raigad News)

Raigad: समुद्रात अचानक आले वादळ, नौका दगडावर आपटून फुटली अन्...
ठग ऑफ हिंदुस्थान! अधिकारी असल्याचं सांगून बड्यांना लुटणाऱ्याला बेड्या

रविवारी श्रीकृष्ण सहकारी मत्यव्यावसायिक संस्थेतील लक्ष्मी विजय मच्छीमार नौका ( IND MH 3 MM 4193) घेऊन बाळकृष्ण रघुविर, जयेश रघुविर, गणेश कुलाबकर, अनिकेत रघुविर हे चारजण श्रीवर्धन समुद्रात मच्छीमारीसाठी गेले होते.

यावेळी समुद्रात अचानक सोसाट्याचा वादळी वारा वाहू लागल्याने सारेजण भयभीत झाले. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आणि नौका सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यासाठी मुळगाव खाडी येथे सुरक्षित नेत होते. मात्र वाऱ्याचा वेग आणि खवळलेला समुद्र यामुळे नौकाचे सुकान तुटल्याने भरकटुन एका दगडावर आदळली. दगडावर बोट आदळल्याने नौका फुटली आणि दांडा तरीबंदर येथे नौका अडकली होती. काही वेळाने ही बोट किनाऱ्यावर आणली मात्र बोटीचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

हे देखील पहा-

नौका फटल्याने बोटीतील चौघेही समुद्रात पडले मात्र मृत्यूशी झुंज देत किनाऱ्यावर आले. त्यामुळे ते बालबाल बचावले. नौका आणि जाळी समुद्रात बुडल्याने मच्छीमारांचे बारा ते पंधरा लाखाचे नुकसान झाले आहे. बोटीचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी विनंती नुकसानग्रस्त मच्छीमारानी केली आहे. गेली दोन वर्षे समद्रामध्ये होत असलेल्या छोट्या मोठ्या वादळामुळे मच्छीमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यातच मासळी मिळत नाही नसून डिझेल, बर्फ, ऑईल, रेशनिग इत्यादी प्रत्येक फेरीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे मच्छीमारी आर्थिक संकटात सापडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com