Wardha: सावरडोह नदीवरील पुलाची उंची वाढवा; नागरिकांसोबत विद्यार्थ्यांचा रास्तारोको

सावरडोह नदीवरील पुलाची उंची वाढवा; नागरिकांसोबत विद्यार्थ्यांचा रास्तारोको
Vardha News
Vardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील कारंजा ते माणिकवाडा मार्गावर सावरडोह नदीवरील पुलाची उंची वाढवण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात नागरिकांसह (Student) विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग आहे. सावरडोह येथे बसस्थानकापुढे हे आंदोलन केले आहे. (Vardha Today News Student Road Blok)

Vardha News
रक्षाबंधनाला नवीन कपडे घेवून दे म्‍हणाला अन्‌..बहिणीला भेटायला जात असताना अपघात

कारंजा ते माणिकवाडा (Vardha) या रोडवर सावरडोह गावाला लागून नदी आहे. इथल्या खडक नदीवरील पूल अतिशय कमी उंचीचा आहे. पावसाळ्यात (Rain) पुलावरून पाणी ओसंडून वाहत असते. त्यामुळे परिसरातील गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो. तासन्‌तास पुलावरील पाणी कमी होण्याची वाट पहावी लागते. मागील ३० वर्षांपासून ही समस्या कायम आहे.

पुलाचे पाणी कमी होण्याची पहावी लागते वाट

पुलावरून पाणी ओसरेपर्यंत जीवनाच्या दैनंदिन व्यवहारात, विद्यार्थ्याच्या शाळेत येण्याजाण्यास, रूग्णांना दवाखान्यात जाण्यास अडचणी निर्माण होत असतात. शेतकरी (Farmer) शेतात गेल्यावर त्यांनासुद्धा तासन्‌तास नदीच्या पुलाचे पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागते. कित्येकदा विद्यार्थ्यांनाही आवागमन करणाऱ्या बसेसमध्ये उपाशी पोटी ताटकळव लागत.

तीव्र आंदोलनाचा इशारा

या मार्गावरील सावरडोह, खापरी, बेलगाव, सुंसुंद्रा, माणिकवाडा मार्गे वरुडकडे हा मार्ग जातो. पुलावरून पाणी असल्यास शेतकऱ्यांना भाजीपाला व शेतमाल विक्रीस नेता येतं नसल्याने नुकसान होते. पुलाच्या बांधकामासाठी नारा, सावरडोह, बेलगाव, सुसुंद्रा माणिकवाडा, साहूर ग्रामपंचायतीने ठराव, निवेदेन दिले आहेत. पण समस्या कायमच आहे. त्यामुळे आता नागरिक, विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. पुलाची उंची वाढवण्याची मागणी करत यावर लवकर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com