Vardha Crime News
Vardha Crime NewsChetan Vyas

Vardha Crime News: तब्बल ९ महिन्यांनी लागला भयंकर हत्येचा छडा; पोलिसांनी शिताफिने घेतला मारेकऱ्यांचा शोध

तब्बल ९ महिन्यांनी मृत व्यक्तीची ओळख पटली आहे तसेच पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
Published on

Vardha Crime News: वर्धा (Vardha) जिल्ह्याच्या कारंजा (घाडगे) पोलीस ठाणे हद्दीत हेटीकुंडी फाट्याजवळ नऊ महिन्यांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. व्यक्तीची हत्या करून मृतदेह टाकून देण्यात आला होता. या घटनेत तब्बल ९ महिन्यांनी मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. तसेच पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Vardha news)

जामणी येथील पोलीस पाटलांनी ३० मार्च २०२२ रोजी नागपूर ते अमरावती मार्गावरील हेटीकुंडी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला होता. याविषयी कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला. मृतकाची ओळख पटविण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस स्टेशन, नागपूर, नागपूर ग्रामीण, अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, भंडारा, गोंदीया, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन हरवलेल्या व्यक्तींची तपासणी केली. घटनास्थळातील आणि परिसरातील तांत्रिक बाबींवर भर देऊनही पडताळणी करण्यात आली.

दरम्यान, कोंढाळी पोलीस ठाण्यात मिसींग नोंद असून त्यातील हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन सदर गुन्ह्यातील मृतकाच्या वर्णनाशी मिळते-जुळते असल्याचे दिसले. हरविलेल्या व्यक्तीचे नाव डोरीलाल उर्फ राजू बन्सीलाल नागवंशी असे होते. तर पत्ता(रा. जरूड, ता. वरूड, जि. अमरावती) होता. पोलिसांनी या व्यक्तीच्या मुलाशी म्हणजे प्रकाश राजू नागवंशी आणि त्याची आई सुमित्रा डोरीलाल नागवंशी यांना अनोळखी मृतकाचे फोटो दाखवले. त्यानंतर मृत व्यक्तीच्या मुलाने हे त्याचे वडील डोरीलाल उर्फ राजू नागवंशी असल्याचे तसेच सुमित्रा नागवंशी यांनी त्यांचे पती असल्याचे सांगितले.

Vardha Crime News
Vardha Crime News: चेहऱ्यावर चाकूने वार करत नागरिकांची लुटमार; सापळा रचत अवघ्या काही तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ओळख पटल्यावर पोलिसांनी २२ डिसेंबर रोजी ओम नामदेवराव पठाडे (वय ३६), (रा. सावळी खुर्द) आणि सुनिल वामनराव ढोबाळे (वय ३२) रा. सावळी (खुर्द) या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. डोरीलाल नागवंशी याच्या मृत्यूबाबत विचारणा केली असता, ओम नामदेव पठाडे याच्याकडील ३ गायी मृतक डोरीलाल नागवंशीने चोरी करुन विकल्याचे सांगतले. तसेच डोरीलालने उसने घेतलेले १४ हजार रूपयेसुध्दा परत देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याची हत्या केल्याचे आरोपींनी मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Vardha Crime News
Vardha News: दुचाकी पार्किंगला लावून तो बाजारात गेला, परत आल्यावर झाला मोठा पश्चाताप...

जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस (Police) निरीक्षक संजय गायकवाड यांच्यासह पथकाने घटनेच्या कालावधीतील महामार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्या संपूर्ण वाहनांची माहिती घेतली. तसेच येथील जवळपास ७००० वाहने तपासण्यात आली. यासाठी वेगळे पथक नेमले होते. अशात आता नऊ महिन्यांनंतर खूनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाला बक्षिस जाहीर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com