Kolhapur: उत्तरप्रदेश म्हणजे संपूर्ण भारत नव्हे; जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

चंद्रकांत पाटलांची गरज आहे. असा माणूस भाजपाचा अध्यक्ष राहावा असा माणूस जास्त काळ अध्यक्ष राहणं आपल्या सोयीचं आहे असा खोचक टोलाही जयंच पाटील यांनी भाषणात लगावला.
Jayant Patil/Chandrakant Patil
Jayant Patil/Chandrakant PatilSaamTV
Published On

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात आज महाविकास आघाडीची पहिली जाहीर सभा मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील (Jayant Patil) उदय सामंत, हसन मुश्रीफ सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मिरजकर तिकटी येथे झाली.

या सभेत बोलतना राष्ट्रवादीचे नेते तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर चांगलाच निशाना साधला ते म्हणाले, जेव्हा हे तिन्ही पक्ष एकत्र येतात तेव्हा भाजपाची धूळधाण होते. भाजपाच्या हातात हा देश गेला, त्यांनी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर वाढले म्हणून आंदोलन केली आता त्यांनीच पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले. प्रवास खर्च वाढल्याने सगळ्या वस्तूच्या किमती वाढल्या. भाजपाला (BJP) माहिती आहे धर्मा-धर्मात जाती-जातीत तेढ निर्माण केली नाही तर आपल्या कडे जनतेसमोर जाताना कोणताही मुद्दा राहणार नाही. दररोज स्वप्नात आमचं सरकार पाडायचं स्वप्न बघतात आणि वेगवेगळ्या तारखा देतात असा टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावला.

चंद्रकांत पाटलांची गरज आहे -

Jayant Patil/Chandrakant Patil
kolhapur: ...तर सोमय्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू; हसन मुश्रीफांचं भर सभेत आव्हान

25-26 आमदार काही उपक्रम घेऊन दिल्लीत गेले तर बातमी काय तर कॉग्रेस आमदार सरकारवर नाराज माध्यम आमची बाजू घेत नाहीत असही ते सभेतील भाषणात म्हणाले. तसंच उत्तरप्रदेश (UttarPradesh) म्हणजे संपूर्ण भारत वर्ष आमच्या बरोबर आहे असं समजू नये. जयश्रीताई 50 हजार मतांनी निवडून येणार असा विश्वास देखील जयंत पाटलांनी व्यक्त केला. तसंच महाराष्ट्राला चंद्रकांत पाटलांची (Chandrakant Patil) गरज आहे असा माणूस भाजपाचा अध्यक्ष राहावा असा माणूस जास्त काळ अध्यक्ष राहण आपल्या सोयीचं आहे असा खोचक टोलाही पाटील यांनी लगावला.

आमच्या तीनही पक्षात कोणी कीतीही भांडण लावण्याचा प्रयत्न केला तरी अडीच वर्षे पूर्ण केलं आहेत. महिलांबंद्दल वाईट शब्द काढणे ही भाजपाची परंपरा आहे असा आरोपही जयंत पाटलांनी या सभेत केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com