कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीच्या (Kolhapur North By-Election) महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात मविआकडून सभा सुरु झाल्या आहेत अशातच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्या करनूर ता. कागल येथील जाहीर सभेत बोलताना मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांना आव्हान दिलं आहे. माझ्या भ्रष्टाचाराचा एक रुपया जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू असं खुल्लं आव्हानच मुश्रीफांनी दिलं आहे.
या सभेवेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील उपस्थितीत होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक रुपया जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू असं ते भर सभेत म्हणाले.
ते आपल्या भाषणात म्हणाले, मी तुम्हाला शपथेवर सांगतो सगळ्या यंत्रणांनी माझा तपास केला मी एक रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही. सात महिने झाले तरी काही अजून काही चौकशीतून निष्पन्न झालेलं नाही.
मात्र आता कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणुक लागली असताना अचानक पुन्हा ते तक्रार करत आहेत. हा काही योगायोग नाही हे मुद्दाम सुरु आहे असा आरोप मुश्रीफ यांनी केला. तसंच जोपर्यंत माझ्या मागे माझी जनता आहे, तो पर्यंत माझा केसही वाकडा होणार नाही, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे ए खुदा होता है, असही ते सभेत म्हणाले.
सोमय्यांनी आज पुण्यात केले आरोप -
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पुण्यात 'राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची १०० कोटीहून अधिक बेनामी प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे अशी मागणी करण्यात आलीय हे पैसे कुठून आली यांची चौकशी झाली पाहिजे, हा पैसा भ्रष्टाचाराचा आहे तो कोठून आला तसंच हसन मुश्रीफ यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे आणि यावरुनच मुश्रीफ यांनी सोमय्यांची मिरवणूक काढायचं वक्तव्य केलं आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.