राज्यातून चाईल्ट पॉर्नोग्राफीचे 15 हजारांपेक्षा जास्त व्हिडिओ आणि फोटो अपलोड

उद्योगपती राज कुंद्राला अटक केल्यापासून पॉर्नोग्राफीचा विषय जस्त चर्चेत आला असतानात राज्यात चाईल्ट पॉर्नोग्राफीचे २१५ गुन्हे दाखल झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
राज्यातून चाईल्ट पॉर्नोग्राफीचे 15 हजारांपेक्षा जास्त व्हिडिओ आणि फोटो अपलोड
राज्यातून चाईल्ट पॉर्नोग्राफीचे 15 हजारांपेक्षा जास्त व्हिडिओ आणि फोटो अपलोडSaam Tv
Published On

उद्योगपती राज कुंद्राला अटक केल्यापासून पॉर्नोग्राफीचा विषय जस्त चर्चेत आला असतानात राज्यात चाईल्ट पॉर्नोग्राफीचे २१५ गुन्हे दाखल झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने "ऑपरेशन ब्लॅकफेस" अंतर्गत डिसेंबर २०१९ आतापर्यंत स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे यामध्ये १०५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. लहान मुलांवरील पॉर्नोग्राफीचे व्हिडीओ, फोटो इंटरनेटवर Viral केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.Upload more than 15,000 video photos of child pornography from across the state

हे देखील पहा-

इंटरनेटवर चाईल्ड पॉर्नोग्राफीची १५ हजारांहून जास्त व्हिडिओ आणि फोटो लिंक अपलोड केल्याची माहिती सायबर विभागाला मिळाली. तसेच नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लोयटेड चिल्डन(NCMEC) या अमेरिकेतील स्वयंसेवी संस्थेने राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाला(NCRB) इंटरनेटवरील अशा वायरल संदेश व व्हिडिओंची माहिती देते. त्यानुसार ही माहिती राज्यातील नोडल संस्थांना पाठवली जाते. या माहितीनुसार राज्यातून डिसेंबर २०१९ पासून आत्तापर्यंत चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या १५ हजार २५५ लिंक अपलोड केल्या गेल्या आहेत. याबाबत भाजपचे नेते आशिष शेलारांनी(Ashish Shelar) नुकतेच केंद्रीय गृहमंञी अमित शहा(Amit Shaha) यांना पत्र लिहून हि बाब निदर्शनास आणून दिली होती.

मुंबई पुण्यातून सर्वाधिक लिंकस् अपलोड

मुंबईत ४४९६ पुण्यातून ५६९९ लिंक अपलोड उर्वरीत लिंक ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद व सोलापूर येथून अपलोड केल्या असल्याची माहीती मिळाली आहे. हे पोर्नोग्राफिक व्हिडिओ बहुतांश म्हणजे ७३ टक्के लिंक(११ हजार ११ लिंक) या मोठ्या शहरांमधून अपलोड करण्यात आल्या आहेत. त्यात याशिवाय जळगाव, ठाणे ग्रामीण, पालघर व कोल्हापूर येथून सुमारे ३० चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या लिंक अपलोड झाल्या आहेत.यावर्षी राज्यात चाईल्ड पॉर्नोग्राफीचे २५ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात सुमारे ५० जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच राज्यात महाराष्ट्र सायबर विभागातर्फे ऑपरेशन ब्लॅकफेस आहे त्या अंतर्गत आणखी काही कारवाया होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातून चाईल्ट पॉर्नोग्राफीचे 15 हजारांपेक्षा जास्त व्हिडिओ आणि फोटो अपलोड
पावसाळ्यात मासिक पाळीदरम्यान होणारे इन्फेक्शन टाळायचे असेल तर...

लॉकडाऊनमध्ये मुंबईतून चार हजारांहून अधिक लिंक

दरम्यान मुंबईमधून लॉकडाऊनच्या काळात ४ हजारांपेक्षा जास्त चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या लिंक अपलोड झाल्या होत्या. त्यातीमधील केवळ ११ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यात तिघांना अटक झाली आहे. नागपूर मध्ये ३०८ प्रकरणांमध्ये एकूण ३८ गुन्हे दाखल झाले आहेत. पुण्यामध्ये १६ गुन्ह्यामध्ये ९ जणांना अटकही झाली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com