Unseasonal Rain : राज्यात अवकाळी सुरूच; बुलढाण्यात वीज पडून एकाचा मृत्यू, जालना, अमरावतीत जोरदार पाऊस

Maharashtra Weather : बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मेहेकर तालुक्यातील बऱ्याच गावांत विजेच्या कडकडाटसह पाऊस पडत आहे
Unseasonal Rain
Unseasonal RainSaam tv
Published On

Maharashtra Unseasonal Rain : गेल्या आठवडाभरापासून राज्यात जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. या दरम्यान कुठे वीज पडण्याच्या घटना देखील घडत आहेत. या दरम्यान आज पुन्हा एकदा जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर बुलढाणा जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान वीज पडून एका जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुलढाण्याच्या मेहेकर तालुक्यात घडली आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मेहेकर तालुक्यातील बऱ्याच गावांत विजेच्या कडकडाटसह पाऊस पडत आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास चायगाव येथील शेतकरी शेती मशागतीचे काम करीत होते. अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. त्यात विजेच्या कडकडाट सह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शेतातील काम करणारे शेतकरी व मजूर काही झाडाखाली जाऊन उभी राहिले. यात शेतकरी शेताच्या बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली उभे राहिले असता अचानक विज कोसळली. त्यात अर्जुन रोही (वय ७५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

Unseasonal Rain
Dhule Corporation : धोकादायक इमारतींना पालिका प्रशासनातर्फे नोटीस; धुळे शहरात ११० धोकेदायक इमारती

जालना शहरात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
जालना
: जालना शहरात आज दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे जालना शहरातील रस्ते काही काळ जलमय झाल्याचेही पाहायला मिळाले. शहरातल्या विविध भागात अचानक आलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. हवामान विभागाने पुढील दोन दिवस जालना जिल्ह्याला वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून खबरदारी घेण्याचा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला.

Unseasonal Rain
Nagpur Crime : उपचारासाठी दाखल कैदी रुग्णालयातून फरार; पोलिसांकडून शोध सुरु

पश्चिम विदर्भात शेतीतील पिकांना मोठा फटका
अमरावती
: अमरावती जिल्हा व परिसरात शनिवारी सायकलच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. काल आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचं अमरावतीमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अमरावती नजीकच्या अंजनगाव बारी परिसराला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा आणि काढून ठेवलेला कांदा पावसामुळे खराब झाला आहे. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

पावसामुळे नाल्यातील पाणी घरात शिरले
हिंगोली
: हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे. काल सायंकाळी कळमनुरी शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कळमनुरी पालिकेचा ढिसळ कारभार पुढे आला आहे, पावसाने नाल्यातून नालीतील घाण पाणी रस्त्यावर व नागरिकांच्या घरात शिरल्याने पालिकेच्या विरोधात महिला नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान पालिका प्रशासनानं पावसाळापूर्वी शहरातील सर्वत्र स्वच्छता न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील या महिला नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com