Unlicensed transport of windmill blades; Three and a half lakh fines collected from vehicles
Unlicensed transport of windmill blades; Three and a half lakh fines collected from vehicles दिनू गावित

Nandurbar: पवनचक्कीच्या पात्यांची विनापरवाना वाहतूक; वाहनांकडून साडेतीन लाखांचा दंड वसूल...

Nandurbar: सुझलॉन कंपनीतील वाहने रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणावर ब्लेडची वाहतूक करतात. अशा वाहनांना रात्रीच्यावेळी घाट रस्त्यातून वाहतूकीस बंदी आहे.
Published on

नंदुरबार: ठाणेपाडा घाट रस्त्यातून रात्रीच्यावेळी विना परवाना पवनचक्कीसाठी (Windmill) सुमारे ६६ मीटर लांबीच्या ब्लेडची (Blades) वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांकडून नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (Nandurbar Sub-Regional Transport Office) साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव (Uttam Jadhav) यांनी दिली आहे. (Unlicensed transport of windmill blades; Three and a half lakh fines collected from vehicles ...)

हे देखील पहा -

Unlicensed transport of windmill blades; Three and a half lakh fines collected from vehicles
महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आता मावळात; एका एकरात सहा लाखाचा निव्वळ नफा

सुझलॉन कंपनीतील वाहने रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणावर ब्लेडची वाहतूक करतात. अशा वाहनांना रात्रीच्यावेळी घाट रस्त्यातून वाहतूकीस बंदी आहे. असे असतांनाही नियम पायदळी तुडवत सुझलॉनची वाहने रात्रीच्यावेळीच वाहतूक करतात. तसेच रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या, रस्त्यावरील फलक व इतर मालमत्तेचे नुकसान करुन सदरची वाहने मार्ग काढतात. याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com