दलित महासंघाचे अनोखे 'उंटावरून शेळी राखणे' आंदोलन !

रुग्णालयाचा कारभार हा उंटावरून शेळी राखण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत दलित महासंघाने थेट उंट आणि शेळी घेऊन रुग्णालयावर मोर्चा काढत निषेध नोंदवला.
दलित महासंघाचे अनोखे 'उंटावरून शेळी राखणे' आंदोलन !
दलित महासंघाचे अनोखे 'उंटावरून शेळी राखणे' आंदोलन !विजय पाटील
Published On

विजय पाटील

सांगली - सांगली Sangli शासकीय रुग्णालयाच्या Government Hospital गलथान कारभाराच्या निषेधार्थ आज दलित महासंघाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. रुग्णालयाचा कारभार हा उंटावरून शेळी राखण्याचा प्रकार असल्याने थेट उंट आणि शेळी घेऊन रुग्णालयावर मोर्चा काढत निषेध नोंदवण्यात आला आहे. Unique Agitation Of Dalit Mahasangha

हे देखील पहा -

सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातून अनेक गोरगरीब रुग्ण उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल होतात. या ठिकाणी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुविधेच्या दृष्टीने मोठा अभाव आहे. सध्या कोरोनाची साथ अद्यापही संपुष्टात आलेली नाही.

मात्र असे असतांना देखील या रुग्णालयाच्या आवारात आणि रुग्णालयामध्ये कोरोना Corona नियमांचं पालन होत नाही. इतर वैद्यकीय सुविधाही Health Facility रुग्णालयात नाहीत. याबाबत रुग्णालयाच्या कोणत्याच अधिकाऱ्याला लक्ष द्यायला वेळ नाही. रुग्णालयाचा कारभार म्हणजे उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार असल्याचा आरोप दलित महासंघाच्या Dalit Mahasangha वतीने करण्यात आला आहे.

दलित महासंघाचे अनोखे 'उंटावरून शेळी राखणे' आंदोलन !
राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नाही - आरोग्यमंत्री टोपे

त्यामुळे विविध मागण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने उंट आणि शेळ्या घेऊन शासकीय रुग्णालयावर मोर्चा काढण्यात आला आणि  रुग्णालयाचा कारभार ज्या पद्धतीने सुरू आहे तो दाखवण्यासाठी उंट आणि शेळी घेऊन रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com