राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नाही - आरोग्यमंत्री टोपे

कोरोना पार्श्वभूमीवर व संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने राज्यात सध्यातरी कोणत्याच प्रकारचे निर्बंध लावणे विचाराधीन नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नाही - आरोग्यमंत्री टोपे
राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नाही - आरोग्यमंत्री टोपेSaamTv
Published On

जालना : कोरोना Corona पार्श्वभूमीवर व संभाव्य तिसऱ्या Third Wave लाटेच्या अनुषंगाने राज्यात सध्यातरी कोणत्याच प्रकारचे निर्बंध लावणे विचाराधीन नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री Health Minister राजेश टोपे Rajesh Tope यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात डेल्टा प्लसच्या Delta Plus रुग्णांसाठी आवश्यक ती काळजी घेतली जात असून खबरदारीच्या दृष्टीने योग्य त्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत असेही ते म्हणाले. There are no plans to impose restrictions in the state - Health Minister Tope

हे देखील पहा -

कोरोना पाठोपाठ आता डेल्टाप्लस या नव्या संसर्गजन्य आणि भयावह आजाराचे रुग्ण जगभरात वाढत आहेत. त्यामुळे राज्यात निर्बध लावण्याचा कोणताही विचार नाही असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे, ते जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभाग तयारीला लागला असून या लाटेला थोपवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स Task Force स्थापन करण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याच देखील ते म्हणाले.

राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नाही - आरोग्यमंत्री टोपे
बीडमध्ये राख वाहतुकीविरोधात महिला आक्रमक; ड्रायव्हरला दिला चपलेने चोप..!

कोरोना संकटाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं. डेल्टा प्लस रुग्णवाढीमुळे घाबरण्याच काम नाही या विषाणूविरुद्ध लढायला महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सक्षम आहे असेही ते म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com