बीडमध्ये राख वाहतुकीविरोधात महिला आक्रमक; ड्रायव्हरला दिला चपलेने चोप..!

परळी आणि परिसरात राख वाहतुकीचा विषय नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. ही राख वाहतूक करणाऱ्या आणि भरधाव वेगात धावणाऱ्या हायवा डंपरमुळे, अनेक अपघात झाले आहेत.
बीडमध्ये राख वाहतुकीविरोधात महिला आक्रमक; ड्रायव्हरला दिला चपलेने चोप..!
बीडमध्ये राख वाहतुकीविरोधात महिला आक्रमक; ड्रायव्हरला दिला चपलेने चोप..!SaamTv
Published On

विनोद जिरे

बीड : बीडच्या Beed परळी Parli तालुक्यात असणाऱ्या गोपीनाथ गड Gopinath Gad येथील, पांगरी कॅम्प परिसरातील महिला, राख वाहतुकी Transport विरोधात आक्रमक झाल्या आहेत. आज सकाळी जवळपास 60 ते 70 हायवा Hyva डंपर आडवत, रस्त्यावर पडलेली राख ड्रायव्हरकडून साफ करून घेण्यात आलीय. तर ज्या ड्रायव्हरने राख साफ करायला विरोध केला, त्याला चपलेने चोप देण्याचे धाडस महिलांनी केलं आहे.Women aggressive against ash transport in Beed

हे देखील पहा -

परळी आणि परिसरात राख Ash वाहतुकीचा विषय नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. ही राख वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगात धावणाऱ्या हायवा डंपरमुळे , अनेक अपघात झाले आहेत. तर या हायवा मधून पडणार्‍या राखेमुळे, अनेक दुचाकी स्लिप होऊन अपघात Accidennt झाल्याने, अनेकांना अपंगत्व आल्याचं सांगण्यात येत आहे.

बीडमध्ये राख वाहतुकीविरोधात महिला आक्रमक; ड्रायव्हरला दिला चपलेने चोप..!
सहा वर्षांची मराठमोळी सोशल मीडिया स्टार

त्याचबरोबर रस्त्यावर पडलेली राख, दुचाकी धारकांच्या डोळ्यात जाऊन, अपघात झालेले आहेत. पावसाळ्यात याच राखेमुळे रस्त्यावर चिखल होतो आणि त्यामुळे दुचाकी स्लिप होण्याचं प्रमाण देखील वाढत आहे. या एक ना अनेक कारणांमुळे पांगरी कॅम्प परिसरातील महिला, आज सकाळीपासून राख वाहतूक विरोधात आक्रमक झाल्या आहेत.

त्यांनी आज 60 ते 70 हायवा आडवत, रस्त्यावर सांडलेली राख या हायवा चालकाकडून साफ करून घेतली आहे. तर ज्या ड्रायव्हरने हे करण्यास विरोध दर्शविला, त्यांना चपलेने चोप देखील देण्यात आलाय. यामुळे स्थानिक प्रशासन हतबल मात्र महिला बटालियन सज्ज झाल्याचं चित्रचं पाहायला मिळत आहे. दरम्यान या राख वाहतुकीवर कडक निर्बंध आणावेत, हायवाची स्पीड कमी असावी, ओव्हरलोड राख वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com