विजय पाटील
सांगली : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनीही फेसबुक लाईव्ह करत माझ्या समोर येऊन कोणी मुख्यमंत्रीपद सोडण्यास सांगितलं, तर या क्षणी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. त्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. याच राजकीय घडामोडींवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( Eknath Shinde Latest News In Marathi )
' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्तेचे बंद केलेले आहे ज्यांनी धंदे; त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे खंदे , आणि आता ते राहिले नाहीत अजिबात अंधे, म्हणून आता आमच्यासोबत येत आहेत एकनाथ शिंदे', या कवितेच्या माध्यमातून आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी भाष्य केलं आहे. पुढे आठवले म्हणाले, 'काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर आघाडी करून सरकार स्थापन करणे चुकीचे आहे, ही त्या आमदारांची भावना आहे. त्यांना विश्वासात घेतले जात नव्हते. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीनंतर मविआ नेत्यांना आता तोंड दाखवायला जागा राहिली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही'.
'२०१९ साली मुख्यमंत्रीपद हवेच, अशी वल्गना करून ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. पण त्यांना पायउतार व्हावे लागणार आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना उद्या विनंती करणार आहे की, लवकरात लवकर राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करा. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रात सत्ताबद्दल होणार हे निश्चित आहे. त्यामुळे लवकरात लवकर सत्ता स्थापन करण्यात यावी अशी विनंती देखील जे.पी.नड्डा यांना करणार आहे', अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी केली.
पुढे आठवले म्हणाले, ' यावेळी अजित पवार प्रकरणासारखा दगा फटका होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळेल'. दरम्यान, आठवले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर देखील भाष्य केलं.' शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हरण्यासाठी उभे राहणार नव्हते. कारण आमचे संख्याबळ जास्त आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.